लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत

 बुलडाणा, दि. 17 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, बुलडाणा जिल्हा कार्यालयामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये सरासरी 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुणांनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह दि. 17 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड, बुलडाणा. येथे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. जे.एम. गाभणे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या