मोताळा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन उत्साहात संपन्न

 

मोताळा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन उत्साहात संपन्न

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा जि.बुलढाणा येथे आज दि.6 जून रोजी शिवराज्यभिषेक दिवस सोहळा उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी पंच परीवर्तन व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेच्यावतीने विविध व्यसायातील माहिती दर्शक स्टॉल, प्रवेश प्रचार स्टॉल मांडण्यात आलेले होते.

कार्यक्रमात नंदकिशोर जाणे, अॅड. योगेश पाटील,  गणेश झंवर, प्रमोद कौसकर, विश्वास पाटील, संस्थेचे आय.एम.सी. अध्यक्ष प्रसाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी नागरिकत्व आणि शिष्टाचार कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण तसेच शिवचरित्र अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बाल छत्रपती शिवाजी राजे यांच्या वेशभुषेत देवाशीष चिंचोले तर मॉसाहेब जिजाऊ यांच्या वेशभुषेत स्वरा इंगळे होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे प्राचार्य एस.डी.गंगावणे यांनी तर सुत्रसंचालन निदेशक ए.एस. पाटील यांनी केले. आभारप्रर्दशन संस्थेचे वरीष्ठ लिपीक व्ही.जी. सरवदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी  पार पाडण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या