नमो शेतकरी महासन्मान निधी योजना; ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा - कृषी विभागाचे आवाहन

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;

ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा - कृषी विभागाचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 10 (जिमाका): केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलै 2025 मध्ये वितरीत केला जाणार आहे. परंतु जिल्ह्यातील 3 हजार 492 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 4 हजार 599 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग(DBT Enable) अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना सन्मान निधीपासून वंचित राहू शकतो. तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई- केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक असून बँक खात्याशी किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करण्याचे काम तत्काळ पूर्ण करून घ्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे बुलढाणा यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या