शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी २४ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी २४ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा,दि. १७ (जिमाका) : महाराष्ट्रातील युवकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून घडवण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी केंद्रांमध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १९ वर्षांखालील पात्र खेळाडूंकरिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रवेश दिला जाणार आहे.

राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनी केंद्रे राज्यातील अमरावती, नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व पुणे या ठिकाणी शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वीत आहेत. सदर ठिकाणी नविन प्रशिक्षणार्थीची निवड करणे प्रस्तावित आहे.

क्रीडा प्रबोधिनीमध्ये समावेश असलेले खेळ प्रकार: आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स, जलतरण व फुटबॉल, ट्रायथलॉन, सायकलिंग अश्या १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.

सरळ प्रवेश प्रक्रीयेद्वारा प्रवेश: क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग खेळत राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू तसेच राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूंची तज्ञ समितीद्वारा चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश व * क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळत राज्यस्तरावर सहभागी खेळाडूना ज्याचे वय १९ वर्ष आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या वेल्निहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून तज्ज्ञ समितीद्वारा चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

वैद्यकीय चाचणी: उपरोक्त चाचणीमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकांद्वारे चाचणी घेऊन कीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्ट्या सुरज खेळाडूंची निवड करण्यात येईल.

रहिवास व वयाबाबतची पात्रता: क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार हा १९ वर्षाखालील तसेच महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे अनिवार्य आहे

आवश्यक कागदपत्रे: कीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार खेळाडूकडे सहभागी झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड तसेच नगरपालिका / ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

            अर्ज कसा व कोठे करावा ? : पात्र खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड तसेच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. २४ जून २०२५ पुर्वी सादर करावे. सदर अर्जात खेळाडूचा संपर्क क्रमांक, पुर्ण पत्ता, ई-मेल आयडी नमुद करावा.

विभागस्तरावर चाचण्याचे आयोजन दि. २६ ते २७ जुन २०२५ या कालावधीत विभागीयस्तरावर होणार आहे, तरी बुलडाणा जिल्ह्यातील पात्र संबंधीत खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, कीडानगरी, जाभरुन रोड, बुलडाणा येथुन अर्ज प्राप्त करुन घेऊन, आवश्यक कागदपत्रे दि. २४ जुन २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्म दाखला, इत्यादी माहिती सादर करावी तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या