जागतिक तंबाखू नकार दिवस' साजरा

 

जागतिक तंबाखू नकार दिवस' साजरा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 02 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत शनिवार दि. 31 मे रोजी जिल्हा रुग्णालय येथे जागतिक तंबाखू नकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी तज्ज्ञाव्दारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू नकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रिंगे, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घाटे, कान, नाक, घसा तज्ञ व प्रमुख मार्गदर्शक डॉ. घोलप, डॉ. विश्वास खर्चे, डॉ. वैष्णव दंतशल्य चिकित्सक श्रीमती कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवातीला ए.एन.एमच्या विद्यार्थी सलोनी पाखरे यांनी स्वरचित गीत सादर केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शन डॉ. विश्वास खर्चे, सुनीता वैद्य व मीरा कोगदे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाम व उपाययोजना संदर्भात माहिती दिली. जागतिक तंबाखु दिनानिमित्याने आयोजित रांगोळी स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्यावतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी एलएचपी व ए.एन.एम. च्या विद्यार्थिनी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णालयीन कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सल्लागार तथा समुपदेशक लखन सरकटे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना आराख व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील राजस, विशाल पवार, ज्ञानेश्वर पवार त्याचबरोबर इतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या