अतिसार नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा

 

अतिसार नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्ह्यात पाच वर्षाखालील बालकांना अतिसार व जुलाब आजारापासून संरक्षित करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहिम राबवावी. यासाठी संबंधित विभागाने समन्वय साधून अतिसार नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवावी, असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिले.

 

अतिसार नियंत्रण कार्यक्रम राबविण्याबाबत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय, एनजीओ, आधार फाउंडेशन डॉ. डोईफोडे व डॉ. शेरखान, सर्व वैद्यकीय अधीक्षक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण सदस्य, जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते.

 

पाच वर्षांखालील जिल्ह्यातील बालकांना अतिसार, जुलाब आजारापासून सुरक्षित करण्यासाठी ओआरएस पावडरचे पाकीट व अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंक गोळ्याचे वाटप आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन आणि मोहिम, तसेच ओआरएस पावडर पाकिट, झिंक गोळ्यांच्या साठ्याची उपलब्धता व आवश्यक मनुष्यबळ आणि कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर नियमित लसीकरणा बाबत सविस्तर माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी दिली.

 

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या