देऊळगाव राजा येथील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

देऊळगाव राजा येथील शासकीय वसतिगृहात  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा येथील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग तसेच अनाथ विद्यार्थी यांना आरक्षित प्रवर्गानुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

देऊळगाव राजा येथील नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या शाळांमधील शालेय व महाविद्यालयीन स्तरावर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र आहेत.

प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून, अर्ज भरल्यानंतर त्याची मुळप्रत वसतिगृहात सादर करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी ही संधी मोठ्या संख्येने घेऊन प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन वसतिगृहाचे प्रभारी गृहपाल व्ही. आर. सोनवळ यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या