डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे

शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा (जि. बुलढाणा) येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अपंग, अनाथ इत्यादी घटकांतील विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेस पात्रता आहे. नांदुरा नगरपरिषद हद्दीतील शाळा, विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना https://hmas.mahait.org या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क: 8975778949 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन गृहपाल एस. व्ही. सोनटक्के यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या