बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी पात्र मुलांचे अर्ज ऑनलाईन 31 जुलै 2025 पर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 5 वर्षे पेक्षा अधिक आणि 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहे. सदरचे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहे. मुलांचे वय 5पेक्षा अधिक व 31 जुलै 2015 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या