जिल्हा कारागृहात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

 



जिल्हा कारागृहात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

 

बुलढाणा, दि.५ (जिमाका) : जिल्हा कारागृह व सामाजिक वनिकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन जिल्हा कारागृह परिसरात आंबा, सिताफळ, शेवगा, बांबु, तुळस अशा विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

 

अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात कारागृह अधीक्षक संदिप भुतेकर व डीएफओ विपुल राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली.

 

यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, सहायक कृषी अधिकारी गजानन सांगळे, वनक्षेत्रपाल पी. आर. तोंडीलायता, वनपाल गजानन डोईफोडे, व्ही.एस. बकाल, ए.ए.गीते, आ. बी. नेवरे, वनरक्षक लक्ष्मी जाधव यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

०००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या