मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मोताळा येथील शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षण टक्केवारीनुसार असेल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील मुलींना प्रवेशासाठी पात्रता दिली जाणार आहे.

मोताळा नगर पंचायत हद्दीतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये येथे शिक्षण घेणाऱ्या आणि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना अर्ज भरता येणार आहे.

प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून, त्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा. यासंदर्भात वसतिगृहाचे गृहपाल अरुण इंगळे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 9423761403 क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट वसतिगृहाला भेट द्यावी.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या