Thursday, 8 August 2024

DIO BULDANA NEWS 08.08.2024

 लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण

बुलडाणा, दि. 08 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 3 लाख 87 हजार 81 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे.

ऑनलाईन प्राप्त अर्जामध्ये मेहकर तालुक्यात 42 हजार 959 अर्जापैकी 42 हजार 956, बुलडाणा तालुक्यात 38 हजार 802 अर्जापैकी 38 हजार 799, लोणार तालुक्यात 25 हजार 661 अर्जापैकी 25 हजार 657, खामगाव तालुक्यात 47 हजार 620 अर्जापैकी 47 हजार 607, संग्रामपूर तालुक्यात 23 हजार 206 अर्जापैकी 23 हजार 198, चिखली तालुक्यात 42 हजार 630 अर्जापैकी 42 हजार 613, नांदुरा तालुक्यात 25 हजार 225 अर्जापैकी 25 हजार 211, शेगाव तालुक्यात 21 हजार 412 अर्जापैकी 21 हजार 400, देऊळगाव राजा तालुक्यात 18 हजार 275अर्जापैकी 18 हजार 256, जळगाव जामोद तालुक्यात 24 हजार 49 अर्जापैकी 23 हजार 994, सिंदखेड राजा तालुक्यात 29 हजार 54 अर्जापैकी 28 हजार 971, मोताळा तालुक्यात 24 हजार 189 अर्जापैकी 24 हजार 113, मलकापूर तालुक्यात 23 हजार 999 अर्जापैकी 23 हजार 923 अर्जांची छाननी तालुकास्तरावर पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 3 लाख 87 हजार 81 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. तालुकास्तरावर 3 लाख 69 हजार 507 अर्ज स्विकृत करण्यात आले. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे दाखल करण्यात आलेले ऑफलाईन अर्ज ऑनलाईनरित्या दाखल करण्यात येत आहे. ऑनलाईन दाखल सर्व अर्जांची तालुकास्तरावर छाननी करण्यात येते आहे.

तालुकास्तरावर स्विकृत करण्यात आलेले सर्व अर्ज जिल्हास्तरावर येणार आहे. यात अर्जाची जिल्हास्तरावरील समितीतर्फे पडताळणी होणार असून त्यानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम आहे.

00000

एसटी महामंडळात दर सोमवार, शुक्रवारी प्रवासी राजा दिन

बुलडाणा, दि‍. 08 : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दि. 15 जुलै 2024 पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचनांचे स्थानिक पातळीवर निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवार आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे.

सदर उपक्रमात विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशी आणि परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील, तसेच तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

बुलडाणा विभागातील आगारामध्ये सातही आकारात प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. बुलडाणा आगारात शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट, चिखली येथे सोमवार, दि. 12 ऑगस्ट, खामगाव येथे शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट, मेहकर येथे सोमवार, दि. 19 ऑगस्ट, मलकापूर येथे शुक्रवार, दि. 23 ऑगस्ट, जळगाव जामोद येथे सोमवार, दि. 26 ऑगस्ट, शेगाव येथे शुक्रवार, दि. 30 ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सदर प्रमाणे परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment