Friday, 16 August 2024

DIO BULDANA NEWS 16.08.2024

आज माझी लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभ

बुलडाणा, दि. 16 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ शनिवार, दि. 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथून या योजनेचा शुभारंभ करणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या महिला उपस्थित राहणार आहेत.

00000

मंगळवारी महिला लोकशाही दिन

बुलडाणा, दि. 16 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. परंतु नारळी पौर्णिमेनिमित्त स्थानिक सुट्टी आल्याने ऑगस्ट  महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. शासकीय सुट्टी आल्यास दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दि. 20 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.

00000

शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करावे

*जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये पात्र ठरले आहे, परंतु आधार प्रमाणीकरण केले नसलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

महा-आयटी यांनी दि. 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरण उपलब्ध करुन दिले आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घेण्यासाठीचा लघुसंदेश महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. तसेच सबंधीत राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी देखील लाभार्थी शेतकऱ्यांना  व्यक्तीशः कळवण्याबाबत बँकांना सुचित केले आहे. या योजनेंतर्गत शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत आणि ज्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे, तथापि आधार प्रमाणिकरण झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधीत बँक शाखांशी संपर्क साधावा आणि आधार प्रमाणीकरण तात्काळ करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

00000

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी दि. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा अनुसूचित जमातीचे नागरिक कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना सन-2024-25 राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना घरकुलाकरीता अर्ज करावेत.

अकोला येथील प्रकल्प कार्यालयात कागदपत्रासह अर्ज दि. 20 ऑगस्ट ते दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, स्वत:च्या नावे पक्के घर नसावे, राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा. घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, पूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वय 18 वर्षे पूर्ण असावे, स्वतःच्या नावाने बँक खाते असावे, वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत असावी लागणार आहे.

योजनेच्या लाभासाइी अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही याचा पुरावा, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधारकार्ड, एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, करारनामा ही कागदपत्रे आवश्यक आहे.

इच्छुकांनी प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, न्यू राधाकिसन प्लॉट, महसूल भवन, अकोला याठिकाणी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्ज स्विकृतीस मुदतवाढ

बुलडाणा, दि. 16 : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज स्विकारण्यास दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज स्विकारण्याबाबत वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.

योजनेसाठी वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष असल्यास अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 30 सप्टेंबर 2024 आहे. तसेच निवड यादी दि. 15ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष असलेल्यासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दि. 15 सप्टेंबर 2024 असणार आहे. तसेच 30 ऑक्टोबर रोजी निवड यादी जाहिर करण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतू इतर मागास बहुजन विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नाही, अशा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेसाठी विद्यार्थी प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी राज्याचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला, विद्यार्थी अनाथ असल्यास महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचे 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के गुण आणि दिव्यांगास 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी, दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडणे आवश्यक आहे, या अटी व शती लागू राहणार आहेत.

00000

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ

बुलडाणा, दि. 16 : पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्विकृतीस दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन विभाग, आदिवाशी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसल्यास या योजनेचा लाभ देण्यात येतो. भटक्या जमाती - क प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांयाठी भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येते.

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी राज्याचा रहिवाशी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला असावा, विद्यार्थी अनाथ असल्यास महिला आणि बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र, विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40 टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के गुण आणि दिव्यांगास 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. भाड्याने राहत असल्याबाबत आणि स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडणे आवश्यक आहे.

योजनेसाठी वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष असल्यास अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 30 सप्टेंबर 2024 आहे. तसेच निवड यादी दि. 15ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष असलेल्यासाठी अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 15 सप्टेंबर 2024 असणार आहे. तसेच 30 ऑक्टोबर रोजी निवड यादी जाहिर करण्यात येणार आहे.

00000





 दिव्यांग, वयस्क मतदारांची विशेष काळजी घ्यावी

-विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

*नवीन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मतदार नोंदणीची प्रक्रिया करावी. मतदानामध्ये दिव्यांग आणि वयस्क मतदारांवर विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपायुक्त संजय पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय यांनी, जिल्ह्यात 17 हजार दिव्यांग आणि 29 हजार 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार नोंदणी झाले आहे. या सर्व मतदारांचे मतदान घरून करून घेण्याची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे या मतदारांच्या नोंदणीबाबत मतदान केंद्र अधिकारी यांनी काळजीपूर्वक हाताळणी करावी. मतदारांनी घरून मतदान करण्याचा पर्याय निवडल्यानंतर तो बदलता येत नसल्याने याबाबतची माहिती देण्यात यावी.

विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगातर्फे मतदारयाद्यांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या निर्दोष असाव्यात. प्रामुख्याने मागील निवडणूकीत नावे असणाऱ्या मतदारांची नावे वगळताना काळजी घ्यावी. तसेच नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयात शिबीर घेण्यात यावी. गावामध्ये मतदार नोंदणी करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात यावे. मतदारांना वोटर हेल्पलाईन ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात यावा. मतदारयादीमध्ये नाव तपासावे, यात नावे नसल्यास तातडीने नमूना 6 भरून मतदान नोंदणी करावी. सध्याच्या कार्यक्रमानुसार 20 ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नोंदणी करण्यावर यंत्रणांनी भर द्यावा. मतदारयाद्या निर्दोष होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे. उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेऊन मतदारयाद्या निर्दोष होण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेण्याचे सांगावे.

मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 2 हजार 288 मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांना त्रास होणार नाही, यापद्धतीने मतदान केंद्रे तयार करावीत. एका कुटुंबातील सर्व मतदार एकाच मतदान केंद्रावर राहतील, याची दक्षता घ्यावी. अधिक मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारांची गर्दी होणार नाही, याचे नियोजन करण्यात यावे. मतदारांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकी‍नंतर विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी निवडणूक विभागाच्या स्ट्राँगरूमची पाहणी केली. तसेच याठिकाणच्या मतदान यंत्रांची पाहणी केली. मतदानयंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

000000

जेम पोर्टलचे मंगळवारी प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 16 : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जेम पोर्टलविषयी मंगळवार, दि. 20 ऑगस्ट रोजी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 11 वाजता हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सुधारित खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जेम प्रचार व प्रसिद्धी आराखडा जेम फॅसिलेटरशी चर्चा करुन तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई -मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपद्धती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास मान्यता दिली आहे. जेम पोर्टलवरुन वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000


No comments:

Post a Comment