Thursday, 29 August 2024

DIO BULDANA NEWS 28.08.2024

 बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ

 

बुलडाणा,(जिमाका),दि.28 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे, अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  ए.टी. सुरडकर  यांनी केले आहे.          

 *******

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

 

बुलडाणा,(जिमाका),दि.28 : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सप्टेंबर 2024 महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 सप्टेंबर   2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ  यांनी कळविले आहे.   

*******

 

शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करावे

*जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका),दि.28 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये पात्र ठरले आहे, परंतु आधार प्रमाणीकरण केले नसलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घेण्यासाठीचा लघुसंदेश महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हयातील बुलडाणा-32, चिखली-6, शेगाव-11, जळगाव जामोद-1, खामगाव -31, मलकापूर-37, मेहकर-10, संग्रामपूर-3 व मोताळा-22 शेतकऱ्यांचा आधार प्रमाणिकरण प्रलंबित आहेत. तसेच सबंधीत राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी देखील लाभार्थी शेतकऱ्यांना  व्यक्तीशः कळवण्याबाबत बँकांना सुचित केले आहे. या योजनेंतर्गत शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत आणि ज्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे, तथापि आधार प्रमाणिकरण झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधीत बँक शाखांशी संपर्क साधावा आणि आधार प्रमाणीकरण तात्काळ करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे. 

*******

No comments:

Post a Comment