जिल्ह्यात 627 एकरवर तुतीची लागवड
बुलडाणा, दि. 26 : चालु वर्षात जिल्ह्यातील 523 शेतकऱ्यांनी 627 एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. तुती लागवड करुन रेशीम उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
मनरेगा अंतर्गत 335 एकर आणि उर्वरीत 290 क्षेत्रावर सिल्क समग्र-2 या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी नोंदणी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत 200 एकर क्षेत्रावर तुती लागवड पुर्ण झाली आहे. शासनाकडून रेशीम शेतीचे महत्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहे. राज्यात सन 2021-22 मध्ये तुती लागवडीखाली असलेले 14 हजार 905 हेक्टर क्षेत्र सन 2023-24 मध्ये 18 हजार 607 हेक्टरवर पोहोचले आहे. यात सुमारे 3 हजार 702 हेक्टरने वाढ झाली आहे.
आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे अनेक शेतकरी वळत आहेत. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी विविध प्रयोग करून अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पारंपारीक पिकासोबतच तुती लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची क्षमता असलेला रेशीम उत्पादन हा कृषी आधारीत अद्योग आहे. तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत बुलडाणासह राज्यातील 24 जिल्ह्यात तुती लागवडीवर भर दिल्या जात आहे.
जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुती लागवड केली जाते. पुर्वी तुतीच्या फांदीपासून कलम तयार करुन लागवड करण्यात येत होती, त्यामध्ये 20 ते 25 टक्के तुट, खाडे पडत असल्यामुळे एकरी 5 हजार 500 झाडांची संख्या राखली जात नव्हती. पर्यायाने प्रती एकर 200 अंडिपुजाचे संगोपन होत नव्हते. आता तुतीच्या तीन महिने पुर्ण वाढ झालेल्या रोपांपासून लागवड केली जाते. मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी रोपे खरेदी व मजुरीचा खर्च देखील दिला जात असल्याने तुती लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
00000
बालकांसाठी मदतीसाठी 1098 हेल्पलाईन
बुलडाणा, दि. 26 : अडचणीत आलेल्या बालकांना मदतीसाठी 1098 ही हेल्पलाईन कार्यरत आहे. या क्रमांकावर संपर्क साधला असता बालकांना संपूर्ण मदत दिल्या जाते.
बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभागामार्फत 18 वर्षापर्यंतचे बालक कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकटात सापडलेले असल्यास, तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण राज्यात कार्यान्वित आहे. या सेवेंतर्गत संकटग्रस्त बालकांना पूर्ण वेळ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे.
सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. त्यामुळे 1098 या टोल फ्री क्रमांकावर वर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
0000000
जिल्हा परिषदेत लखपती दीदी सन्मान सोहळा
बुलडाणा, दि. 26 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील जळगाव येथे सुरु असलेल्या लखपती दीदी संमेलन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषदेतील शिवाजी सभागृहात करण्यात आले.
सदर कार्यक्रमात लखपती दीदीसमवेत समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच लखपती दीदींना प्रमाणपत्र, राज्य अभियान कक्षातर्फे साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी, मालमत्तावर आठ ते दहा टक्के महिलांचा अधिकार आहे. तसेच आर्थिक बाबतीत निर्णय क्षमता पुरुषांपेक्षा महिला उत्तम स्वरूपात पार पडतात. महिलांना अधिकार मिळाल्यास त्यांची प्रगती होण्यास मदत मिळणार आहे. याच संकल्पनेने लखपती दीदी बनविण्याचे काम उमेद अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. महिलांच्या उद्योग उभारणीसाठी शासनाची मदत देण्यात येत आहे. महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया स्वतःपासूनच करावी अशी सूचना केली. तसेच विविध योजनेतील वैयक्तिक सबसीडीचे कर्ज प्रकरण समुदाय संसाधन व्यक्तींनी प्रस्ताव बँकेत सादर करावे, असे सांगितले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना देऊन त्यांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आरोग्य, शिक्षण राहणीमान उंचावणे. प्रभाग संघ स्तरावर मार्केटिंग उपलब्ध करावे, तसेच उद्योजगता विषयक मार्गदर्शन केले.
श्रीपाल सोनटक्के सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी, समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थिती होते.
00000
टपाल विभागातर्फे बचत खाते सुरू करण्यासाठी मोहीम
बुलडाणा, दि. 26 : टपाल कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयामध्ये विविध बचत खाते सुरू करण्यासाठी आजपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम दि. 7 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.
विविध योजनांमध्ये आर्थिक समावेशन अंतर्गत मोहिमेत ग्राहकांना खाते उघडण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. यात बचत खात्यात किमान ठेव आवश्यकता फक्त 500 रूपये राहणार आहे. तसेच मुदत ठेवी, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, किसान विकास पत्र आदी उच्च व्याज दर आणि मोजक्या योजनेतील जमा रकमेवर कर लाभ मिळणार आहे. विविध खाते प्रकारात खाते उघडता येऊ शकेल. जिल्ह्यातील नागरिकांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, यासाठी टपाल कार्यालयाला भेट द्यावी, तसेच खाती उघडावीत, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे.
00000
विशेष मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल जप्त
बुलडाणा, दि. 26 : राज्य उत्पादन शुल्कतर्फे गेली दोन अवैध दारूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात 27 गुन्ह्यांसह 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 23 व 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 26 वारस गुन्ह्यांसह 26 आरोपी, 388 लिटर हातभट्टी, 6624 लिटर रसायन, 83 लिटर देशी मद्य, 5.4 लिटर विदेशी मद्य यासह एकूण 3 लाख 99 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निरीक्षक के. आर. पाटील यांनी बुलडाणा शहरातील भीलवाडा, आंबेडकर नगर, कैकाळीपुरा येथील अवैध हातभट्टीवर 5 वारस गुन्हे नोंदवून 122 लिटर हातभट्टी आणि 1918 लिटर रसायनासह 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक श्री. बोज्जेवार आणि श्री. माकोडे यांनी भादोला, डोंगरखंडाळा येथे अवैध मद्य विक्री 6 वारस गुन्हे नोंदवून 108 लिटर हातभट्टी आणि 2272 लिटर रसायन आणि 15 लिटर देशी असा 1 लाख 10 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक व्ही एम. पाटील यांनी मनसगाव, शेगाव, देवधाबा, मलकापूर येथे अवैध हातभट्टी व मद्यविक्रीचे 9 वारस गुन्हे नोंदविले. यात 158 लिटर हातभट्टी आणि 3418 लिटर रसायन आणि 10.17 लिटर देशी असा 1 लाख 67 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक श्री. रोकडे आणि दुय्यम निरीक्षक श्री. रोटे, नयना देशमुख यांनी चिखली, देऊळगावराजा येथे अवैध मद्यविक्रीचे 6 वारस गुन्हे नोंदवून 64.08 लिटर देशी आणि 5.40 लिटर विदेशी असा 30 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.
00000
आरसेटीमध्ये सूक्ष्म उद्योजकता विकास प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 26 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार रोजगार प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांच्या वतीने समुदाय संसाधन व्यक्तीसाठी सूक्ष्म उद्योजकता विकास प्रशिक्षण घेण्यात आले.
स्वयंरोजगाराची गरज, क्षमता प्रशासन, प्रभावी संप्रेषण, व्यवसाय संधी मार्गदर्शन, बाजार सर्वेक्षण, बँकिंग, नेतृत्व गुण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून दिलीप ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था संचालक संदीप पोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना ईडीपी व बँकिंगविषयी माहिती दिली. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक सक्षमता, शासकीय योजना, सामाजिक सुरक्षा योजनेविषयी माहिती दिली. प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक मनिषा देव, प्रशांत उबरहंडे, कल्पना पोपळघट यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सहाय्य केले. आरसेटीतर्फे बेरोजगार सुशिक्षित तरुणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते.
000000
No comments:
Post a Comment