जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
बुलडाणा, दि. 05 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, तसेच विविध एकविध खेळ संघटनेतर्फे जिल्हास्तर शालेय विविध क्रीडा स्पर्धा दि. 16 ऑगस्ट 2024 पासून घेण्यात येणार आहे.
तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सन 2024-25 या वर्षात 92 खेळाचे आयोजन आयोजित करण्यात येणार आहे. आयोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेची सभा पार पडली. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनुदानित, नगर परिषद, जिल्हा परिषद व विनाअनुदानित शाळेतील क्रीडा शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात सहभागी खेळाडूची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत दि. 10 ऑगस्ट असून शाळांना संस्थेतील खेळाडूंची नोंदणी करावी लागणार आहे.
सदर स्पर्धा या 14 वर्षे, 17 वर्षे, 19 वर्षे मुले, मुली या गटामध्ये होणार आहे. यात सायकलिंग, शुटींग बॉल, वुशु, लॉन टेनिस, मल्लखांब, सिकई मार्शल आर्ट, मॉर्डन पेन्टॅथलॉन, रोल बॉल, सॉफ्ट टेनिस, बेसबॉल, वेटलिफ्टींग, ज्युदो, डॉजबॉल, नेटबॉल, आर्चरी, बॉल बॅडमिंटन, तलवारबाजी, टेबल टेनिस, सॉफ्टबॉल, रायफल शुटींग, नेहरु कप हॉकी, कॅरम, बॉक्सिंग, रग्बी, जिम्नॅस्टिक, आट्यापाट्या, रोलर स्केटींग, हॉकी, सेपक टकरा, थ्रोबॉल, कुस्ती, बास्केटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, जलतरण, वॉटर पोलो, स्क्वॅश, टेनिक्वाईट, बुद्धीबळ, फुटबॉल, योगासन, कबड्डी, खो-खो, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, किक बॉक्सिंग, कराटे, क्रिकेट, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स आदी अनुदानित खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच स्पिडबॉल, तेंग सुडो, आष्टे डु आखाडा, कुडो, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, हाप किडो बॉक्सिंग, रोप स्किपींग, टार्गेट बॉल, ग्रॅपलिंग, लगोरी, युनिफाईट, मिनी गोल्फ, बेल्ट रेसलिंग, सिलंब्बम, वुड बॉल, कॉर्फ बॉल, लंगडी, सुपर सेवन क्रिकेट, फ्लोअर बॉल, पावर लिफ्टिंग, बिच व्हॉलीबॉल, टेबल स्वॉकर, वुडो मार्शल आर्ट, चॉकबॉल, म्युझिकल चेअर, जम्परोप, स्पोर्ट डांस, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, तायक्वांदो, फिल्ड आर्चरी, टेनिस बॉल क्रिेकेट, टेनिस व्हॉलीबॉल, थांगता मार्शल आर्ट, युग मुंदो, कुराश, रस्सीखेच, हुपक्वांदो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, थाय बॉक्सींग, पेन्टॅक्यु, फुटबॉल टेनिस या विनाअनुदानित खेळाचे आयोजन संघटनेच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने होणार आहे.
सदर स्पर्धांमध्ये शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवहन जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment