बॅटरी फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 02 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत बॅटरी संचालित फवारणी यंत्र व कापूस साठवणूक बॅग वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना बॅटरी संचालित फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीच्या लाभासाठी mahadbt.maharashtra.gov.in/
00000
आरटीई प्रवेश प्रक्रियेस 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
* कागदपत्रे पडताळणी, शाळेत प्रवेश करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 02 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना सन २०२४-२५ या वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून आता 5 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि शाळा प्रवेश होणार आहे.
सदर प्रक्रियेनुसार लॉटरी पद्धतीने निवडपात्र ठरलेल्या बालकांना शाळांमध्ये प्रवेशासाठी दि. 23 जुलैपासून 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली. आता आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांना कागदपत्रे पडताळणी आणि शाळाप्रवेश घेण्यासाठी दि. 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांची निवड झाली असल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी करुन शाळेमध्ये प्रवेश अंतिम करावा. यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नसल्याने जिल्ह्यातील सर्व पालक आणि शाळांनी मुदतीपूर्वी प्रवेशाची कार्यवाही करावी, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.
000000000
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
बुलडाणा, दि. 02 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादितच्या कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करण्यात आली.
जातपडताळणी समितीचे मनोज मेरत अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. एल. उईके, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त एस. टी. सोनोने, डॉ. बी. आर. दाभाडे. उपस्थित होते.
सुरवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. मेरत यांनी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे शिष्यवृतीचे वितरण केले. सतीष बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. गौड यांनी आभार मानले.
महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे, कार्यालयीन सहायक एस. आर. बोराळकर, महादेव विद्यागर, जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विकास महामंडळाचे एच. जी. आत्राम, समाज कल्याण विभागाचे खानवे, श्री. हिवाळे, श्री. जाधव, श्री. घाटोळे, श्रीमती तायडे, श्रीमती राऊत, विलास मानवतकर, श्रावण खरात, के. एन. नाटेकर, अॅड. डिगांबर अंभोरे, गजानन साठे उपस्थित होते. वैशाली पवार, रेखा मोरे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
00000000
महसूल पंधरवड्यानिमित्त ‘सैनिकहो तुमच्यासाठी’चे आयोजन
बुलडाणा, दि. 02 : राज्यभरात महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, विरपिता यांच्यासाठी शनिवार, दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे
जिल्ह्यातील संबधित तहसील कार्यालयामध्ये सेवेत असलेले सैनिक, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या महसूल संबंधित समस्या, दाखले, प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील आजी सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, विरपिता यांच्या महसूल संबधित अडचणी सोडविण्यात येणार आहे. यासाठी दि. 5 व 6 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सकाळी 12 वाजेपर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment