जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिनाची शपथ
बुलडाणा, दि. 20 : सद्भावना दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ देण्यात आली. यावेळी नायब तहलिसदार श्याम उमाळे यांनी शपथ दिली.
यावेळी नायब तहसिलदार विजय हिवाळे, किशोर हटकर, अवल कारकून शिला पाल, अपेक्षा इंगळे, वर्षा मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांना सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याची शपथ देण्यात आली.
00000
उद्योजकांसाठी डिजिटल लोन, बीज प्रक्रियेविषयी कार्यशाळा
बुलडाणा, दि. 20 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे रॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने उद्योजकांसाठी डिजिटल लोन अप्लिकेशन आणि फायनान्शियल नॉलेजबाबत दोन दिवसीय, तसेच बीज प्रक्रियेबाबत पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा नि:शुल्क असून कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणी दि. 24 ऑगस्ट 2024 पर्यंत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा, मो. क्र. 8275093207, 8208603487 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमसीईडीचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.
00000
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकपदी डॉ. पराग नवलकर रुजू
बुलडाणा, दि. 20 : राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकपदी डॉ. पराग नवलकर आज रूजू झाले आहेत. याआधी अधीक्षक असलेल्या भाग्यश्री जाधव यांची सोलापूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालना येथे कार्यरत असलेले डॉ. पराग नवलकर यांची नियुक्ती झाली असून ते रुजू झाले आहे.
00000
बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ
बुलडाणा, दि. 20 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता दि. 26 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे, अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जबाब देण्यास उपस्थित राहण्यासाठी जाहिरनामा
बुलडाणा, दि. 16 : बुलढाणा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या आरोपीस सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याबाबत जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा यांचे कार्यालय प्रलंबित असलेले नि.फौ.प्र.क्र.54/2015, सरकार वि. प्रशांत + २, चौ.ता. 19 ऑगस्ट 2024, नमुना क्र. 4 आरोपी व्यक्तीस उपस्थित राहण्यास फर्माविणारी उद्घोषणा (कलम 82 पहा) ज्याअर्थी विनोद दामोधर अरबट ऊर्फ पाटील, रा. सातारा एरीया, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद, याने कलम 467,468, 471, 420, 34 भा.दं.वि. खाली शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे (किंवा केला असल्याचा संशय आहे) अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यावरुन अटक वॉरंट काढले असता उक्त विनोद दामोधर अरबट ऊर्फ पाटील, रा. सातारा एरीया औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद हा सापडू शकत नाही, असे प्रतिवेदन देण्यात आले आहे, आणि त्याअर्थी, उक्त विनोद दामोधर अरबट ऊर्फ पाटील, रा. सातारा एरीया, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद, हा फरारी झालेला आहे (किंवा सदर वॉरंटाची बाजावणी चुकविण्यासाठी तो गुप्तपणे वावरात आहे) याबाबत खात्री पटविण्यात आली आहे. म्हणून उक्त आरोपीस जवाब देण्यासाठी विनोद दामोधर अरबट ऊर्फ पाटील, रा. सातारा एरीया, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद, यास दि. १९/०८/२४ रोजी विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलडाणा न्यायालयासमक्ष उपस्थित होण्यास फरविण्यात येत आहे, अशी याद्वारे उदघोषणा करण्यात आली आहे.
0000000
उत्कृष्ट गणेश मंडळाला पुरस्कारात सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उत्कृष्ट गणेश मंडळाला पुरस्कार देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी मंडळांचे गुणांकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
श्री गणेशोत्सव 2024 अंतर्गत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचे व त्यासदंर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात उपजिल्हाधिकारी रोहयो हे अध्यक्ष असतील. तसेच पोलीस उपअधिक्षक, गृह, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राचार्य, जिजामाता महाविद्यालय हे सदस्य असणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहे.
जिल्हास्तरीय समिती गणेशोत्सव सुरू होण्याचा दि. 7 सप्टेंबर 2024 पासून अनंत चतुर्दशी दि. 17 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत प्रत्यक्ष भेट देणार आहे. व्हिडीयो व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घेतील. समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत शासन निर्णयामध्ये नमुद तक्त्यानुसार गुणांकन करुन त्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांच्या संबंधित कागदपत्रे, व्हिडीयो व गुणांकन संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांना सादर करतील.
00000
No comments:
Post a Comment