DIO BULDANA NEWS 29.08.2024
युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील
उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान
बुलडाणा, दि. 29 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेत जिल्ह्यातील 18-35 वयोगटातील उमेदवारांची डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क ट्रेनी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगर विकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त गंगाधर पेंटे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग गोपाल चव्हाण उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment