जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा

 



जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा

 

बुलढाणा,दि.28 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दि.28 एप्रिल रोजी दशकपूर्ती झाल्यानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात "सेवा हक्क दिन" साजरा करण्यात आला.

 

नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त विविध सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व विहीत कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दि. २८ एप्रिल २०१५ पासून अंमलात आला. या अधिनियमाची दशकपूर्ती झाल्यानिमित्त हा दिवस जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने सेवा कटिबद्धतेची शपथ घेतली.

 

या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी अजिंक्य गोडगे, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसिलदार वृषाली केसकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या