महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक ; ३ एप्रिलला मतदान

 महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक ; ३ एप्रिलला मतदान


वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन


बुलढाणा, दि.२ (जिमाका) :  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक आज गुरुवार, ३ एप्रिल रोजी पार पडणार असून, मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशानुसार, विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य शासनाने मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अवर सचिव सुनिलकुमार धोंडे यांची नवीन निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.


निवडणुकीसंदर्भात सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना सूचना देण्यात आली असून, नियोजित वेळापत्रकानुसार मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या