जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

 


जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

बुलढाणा, (जिमाका) दि. 4 :  खरीप हंगाम 2024-2025 मध्ये केंद्र शासनाच्या आधरभुत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने 27 मार्च 2025 पासून चना खरेदीसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 25 एप्रिलपर्यंत संबंधीत खरेदी केंद्रावर चना खरेदी करीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम.जी. काकडे यांनी केले आहे.

  केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत हमीदराने चना खरेदीसाठी नोंदणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या. बुलढाणा, मेहकर, लोणार, शेगांव, संग्रामपुर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, पिंप्री खंदारे/दुसरबीड, कृषि उत्पन्न बाजार समिती संग्रामपुर केंद्र - वरवट बकाल, कृषि उत्पन्न बाजार समिती शेगाव केंद्र - माटरगांव, ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, देऊळगावराजा, तापडीया ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी सिंदखेडराजा, श्रीनंदना महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी अंजनी खु., सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, साखरखेर्डा, शेतीसेवा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी बिबी, विदर्भ समृध्दी कृषि प्रोड्युसर कंपनी जानेफळ, कुलभवाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वडगांव पाटण, राजश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी हिरडव, श्राव्यलक्ष्मी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी मेरा खुर्द, अमडापुर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अमडापुर, जय सरदार कृषि विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी भोरटेक, माजगदंबा फार्मर प्रोड्युसर कंपनी, जांभुळधाबा, बळीराजा कृषिमाल प्रक्रिया बहुउद्देशिय सह. संस्था पळशी झांशी, देवि तुळजाई अॅग्रोटेक प्रो. कं. लि. मारोतीपेठ, किसान कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था सोनाळा, संत देविदास महाराज शेतकरी प्रो. कं. सिनगांव जहांगिर, झोटिंगा ॲग्रो प्रो. कं. लि. वाघाळा, मॉ. तुळजाई अॅग्रो फार्मर प्रो. कं. लि. गोरेगांव, संत गजानन महिला फार्मर प्रो. कं. लि. धामनगांव बढे, अॅक्टीफील्ड फार्मर प्रो. कं. मोळा, शिवशंभो अॅग्रोटेक प्रोड्युसर कंपनी धाड अशी एकूण 32 खरेदी केंद्रांवर चना खरेदी नोंदणी सुरु करण्यात आले आहे.

चना नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पत्राव्दारे करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या