राष्ट्रीय भूमि अभिलेख दिनानिमित्य मार्गदर्शन शिबीर

  राष्ट्रीय भूमि अभिलेख दिनानिमित्य मार्गदर्शन शिबीर


बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्य उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत बुधवार दि. 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ई- फेरफार, ई-मोजणी व्हर्जन-2, नकाशाचे डिजीटायझेशन, ई-चावडी, रोर्व्हर तंत्रज्ञानाव्दारे मोजणी अशा विविध सुविधासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.


भूमि अभिलेख विभाग हा मुख्यतः जमिनीची मोजणी करणारा विभाग म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत भूमि अभिलेख विभागाने आपल्या सर्व सेवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख सहज व जलद गतीने सर्व नागरीकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सुविधाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. 

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या