शासकीय औद्योगिक प्रशिक्षण साहित्य विक्रीकरिता निविदा आमंत्रित

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण साहित्य विक्रीकरिता निविदा आमंत्रित

बुलढाणा, (जिमाका) दि. 11 : पलसिध्द महास्वामी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा, जि.बुलढाणा या संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी प्रात्यकक्षिकासाठी वापरण्यात आलेली तसेच कालबाहय झालेल्या निरुपयोगी हत्यारे, मशिनरी व स्क्रप निर्लेखित करण्यात आलेली असून विक्री करण्यासाठी सीलबंद निविदा मागविण्यात येत आहे. सदर साहित्याची यादी व साहित्य पाहणी साठी संस्थेत दि. 11/04/2025 ते 21.04.2025 कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल, साहित्याची संख्या कमी अधिक करण्याचे, नाकारण्याचे अधिकार मा. प्राचार्य श्री.प.म.शा.औ.प्र. सं. बुलढाणा, जि.बुलढाणा यांनी राखून ठेवलेले आहे. मोहरबंद निविदा कार्यालयीन वेळेत दि. 22.04.2025 दुपार 1.00 वाजेपर्यंत टाकण्यात याव्या नंतर स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.

निविदेची अट व शर्ती कार्यालयात उपलब्ध आहे. निविदा अर्जाची किंमत रु. 100/- रोख भरून वरील नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध करून देन्यात येईल.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या