मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

 

मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मेहकर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, मेहकर येथील निवडणूक विभाग येथे सोडत काढण्यासाठी सभा आयोजित करण्यात आले आहे.

तसेच अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती. नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होणार असुन उपविभाग मेहकर अंतर्गत मेहकर तालुक्याचे स्त्रियांकरिता आरक्षण सोडत ठिक दुपारी 2 वाजता जिल्हानियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडती करीता मेहकर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत मेहकर तहसिलदार निलेश मडके यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या