कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण; स्थानिक तक्रार समितीतील अध्यक्ष, सदस्य पदासाठी अर्ज आमंत्रित

 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण;

स्थानिक तक्रार समितीतील अध्यक्ष, सदस्य पदासाठी अर्ज आमंत्रित

       

 बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमानुसार, जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करण्यासाठी इच्छुक पात्र व्यक्तीकडून दि. 29 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा स्थानिक तक्रार समितीचे सदस्य सचिव यांनी दिली.

अध्यक्ष पदाकरीता पात्रता : अर्जदार किमान पदवीधर असावा, केवळ महिला व्यक्ती अध्यक्षपदासाठी अर्ज करून शकेल, महिलांच्या सोयीसाठी बांधील असावे. तसेच सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असावा. अशासकीय अध्यक्षाचा कालावधी नेमणूकीपासून 3 वर्षाचा राहील.

सदस्य पदाकरीता पात्रता : महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकिय संघटना, संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यामधून दोन सदस्य नामनिर्देशीत करावयाचे आहेत. त्यापैकी किमान एक सदस्य महिला असावी, कायद्याची पार्श्वभूमी असलेला असावा. तसेच किमान एक सदस्य, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.

इच्छूक पात्र व्यक्तिनी आपले शैक्षणिक पात्रता, कामाविषयीचा अनुभव व संमतीपत्र समितीच्या अध्यक्ष व सदस्य या पदावर नियुक्ती करणेबाबतचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टैंडच्या मागे मुठ्ठे ले आऊट डॉ. जोशी नेत्रालय बुलढाणा या कार्यालयास सादर करावे, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या