कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथक; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

 कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथक; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

बुलढाणा, (जिमाका) दि. 11 : खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण कृषी निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावी तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, जादा दराने, साठेबाजी व अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  असे प्रकार निर्देशनात आल्यास तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बुलढाणा यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यामध्ये 1 व जिल्ह्यास्तरावर 1 असे एकुण 14 भरारी पथक नेमण्यात आले आहे. या भरारी पथकांमार्फत तपासणी तसेच कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योग्य ती खते, बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील सन 2024-25 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुणनियंत्रण विषयक बियाणे नमुने-1312, खते-619, किटकनाशके-231 कृषि निविष्ठाचे नमुने काढून 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तर 116 केंद्रांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. तसेच बियाणे- 174, खते-28, किटकनाशके-14 विक्री बंद आदेश देऊन संबंधीत कृषि सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे.

सन 2024-25 मध्ये कंपनी विरूध्द बियाणे-5, खते-5, किटकनाशक- 1 असे एकुण 11 विविध कंपन्यावर कोर्ट केस दाखल करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात 2025 च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे 1,72,750 मे. टन खतांची मागणी केली आहे. कृषी विभागांतर्गत गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथकामार्फत दर माहिन्याला अचाणक तपासणी करण्यात येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या