पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांवराजा तालुक्यातील निमखेड गावासाठी टँकर मंजूर

 

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांवराजा तालुक्यातील निमखेड गावासाठी टँकर मंजूर

    बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगांवराजा तालुक्यातील निमखेड गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे निमखेड येथे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.

निमखेड येथे 1 हजार 19 पशुधन व 584 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 32 हजार लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.  पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या