तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप
तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : समाजकल्याण कार्यालय
येथे सामाजिक न्याय पर्व अंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तीकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी जिल्ह्यातील 34 तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात
आले.
जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींची नोंदणी
ऑनलाईन प्रणालीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या तृतीयपंथीयाची नोंदणी झाली नाही,
त्यांनी ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी केले. त्यानंतर उपस्थित तृतीयपंथीय
यांच्या समस्या जाणुन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय यांनी त्यांच्या
निवासाकरिता जागा उपलब्ध व्हावी यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी प्रणिता
बावणकर, विजया राऊत, रिता जाधव, किरण गवई आदी उपस्थित होते.
00000


Comments
Post a Comment