उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर; एप्रिल ते जून दरम्यानचा दौरा कार्यक्रम

 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर; एप्रिल ते जून दरम्यानचा दौरा कार्यक्रम

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : माहे एप्रिल ते जून 2025 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. नागरिकांनी तालुका स्तरीय शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

 

शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : एप्रिल महिण्यात जळगांव जामोद येथे 4, शेगांव 7 व 24, मेहकर 9 व 29, खामगांव 11 व 25, मलकापूर 15 व 28, चिखली 16, देऊळगांव राजा 17, लोणार 22, नांदुरा 21, सिंदखेडराजा 23 रोजी होणार आहे. माहे मे महिण्यात जळगांव जामोद 5, शेगांव 6 व 26, मेहकर 8 व 30, खामगांव 13 व 27, मलकापूर 14 व 29, चिखली 16, देऊळगाव राजा 19, लोणार 20, नांदुरा 22, सिंदखेड राजा 23 रोजी होणार आहे.  तसेच माहे जून महिण्यात जळगांव जामोद येथे 5, शेगांव 6 व 24, मेहकर 9 व 30, खामगांव 10 व 26, मलकापूर 12 व 27, चिखली 16, देऊळगाव राजा 17, लोणार 19, नांदुरा 20, सिंदखेड राजा 23 रोजी होणार आहे.

0000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या