पवित्र पोर्टलद्वारे ३० हजार २०९ शिक्षक पदांची भरती; उमेदवारांना ६ ते ११ ऑगस्टदरम्यान पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्याची संधी
बुलढाणा, दि. 7(जिमाका): राज्यातील शासकीय तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत विविध व्यवस्थापनांच्या एकूण ३० हजार २०९ रिक्त शिक्षक पदांची जाहिरात प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर लॉगिन करून पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो दि. ६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत लॉक करणे आवश्यक आहे. प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वीच्या १४ हजार ३२०, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या १० हजार १२, इयत्ता ९ वी ते १० वीच्या ५ हजार ५१३ आणि इयत्ता ११ वी ते १२ वीच्या ३६४ पदांचा समावेश आहे. विविध व्यवस्थापनांकडून प्राप्त जाहिरातींमध्ये शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खासगी शैक्षणिक संस्था तसेच नगर पालिका/परिषदा, महानगरपालिका आणि आदिवासी विकास विभागांतर्गत रिक्त पदांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, नगर पालिका/परिषदांकडील २८०, महानगरपालिकांतील १ हजार ९५४ आणि आदिवासी विकास विभागातील २ हजार ४२१ पदांचा समावेश आहे. पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक : पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पोर्टलवर प्...