नोव्हेबरमध्ये होणार जिल्हा युवा महोत्सव
बुलडाणा,(जिमाका),दि.30 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद
तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा
यांचे संयुक्त विद्यमाने "विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना"
वर जिल्हास्तरीय युवा महोत्वाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे 15 ते 25 नोव्हेंबर
2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील 15 ते 29 या वयोगटातील
युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.
महानकर यांनी केले आहे.
युवकांचा सर्वांगिण विकास, संस्कृती
परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता
निर्माण होण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केल्या जाते. या महोत्सवामध्ये विविध
उपक्रम राबविण्यात येते. संकल्पना आधारित स्पर्धामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील
नवसंकल्पना, सांस्कृतिक उपक्रमामध्ये समूह लोकनृत्त, लोकगीत, वैयक्तिक लोकनृत्य व वैयक्तिक
लोकगीत, कौशल्य विकासामध्ये कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता. युवा कृतीमध्ये हस्तकला,
वस्त्रोद्योग ॲग्रो प्रोडक्ट असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हास्तरावर
करण्यात येणार असून जिल्ह्याचा प्रतिनिधिक चमु विभागीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात
येईल. युवा महोत्सवामध्ये, सांस्कृतिक, समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत,
वैयक्तिक सोलो लोकगीत, कौशल्य विकास, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा
(इंग्रजी व हिंदी, फोटोग्राफी, संकल्पना आधारीत स्पर्धा, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी
विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, युवा कृती, हस्तकला, वस्रोद्योग,
अॅग्रो प्रोडक्ट या स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे. महत्वाचे रेकॉर्ड
केलेले गाणे व म्यूझिक, बॅलें डान्स पात्र राहणार नाही. सादरीकरणामध्ये असभ्यता, धार्मिक
व राजकिय भावना दुखावणार नाही याची दखल घ्यावी. असे आढळल्यास सादर केलेला उपक्रम अपात्र
समजण्यात येईल. प्रथम क्रमांकाचे स्पर्धकास विभागीय स्तरावर पाठविण्यात येईल.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागीसाठी 15 ते 29 वयोगटातील (12 जानेवारी 2025 रोजी वयाची परिगणनेनुसार
असावा. वयाचा दाखला/आधार कार्ड आवश्यक, जिल्ह्यातील संगीत महाविद्यालये, कृषि महाविद्यालये,
विद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र विद्यालये,
आयटिआय, विज्ञान महाविद्यालये, समाजकार्य, महिला मंडळे, सांस्कृतिक मंडळे, नोंदणीकृत
मंडळे इत्यादींची, 15 ते 29 वयोगटातील युवांना युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता
राहील. त्याप्रमाणे स्पर्धक महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता,
जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी व वयाबाबतचा सबळ पुरावा सुध्दा सादर करणे
आवश्यक आहे. सहभागी युवक, युवतींना सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र सुध्दा वितरीत करण्यात
येईल. युवा महोत्सवातील प्राविण्य धारकांसाठी रोख (शासन आदेशानुसार) पारितोषिक देण्यात
येणार आहेत. अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा किंवा क्रीडा अधिकारी आर. आर. धारपवार,
मो.नं. 9970118797 यांचेशी संपर्क करावा.
00000