Thursday, 10 December 2020

DIO BULDANA NEWS 10.12.2020

 जिल्ह्यातील 436 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर

  बुलडाणा,(जिमाका) दि.10 : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील 3 (अ) (ब) तसेच नियम 2- अ पोटनियम 4 अन्वये जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी 436 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिलांसाठी राखीव आरक्षण आज 10 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. सदर आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित होते. तसेच तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधीत तालुक्याचे तहसिलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले.

 तालुकानिहाय एकूण ग्रामपंचायती, प्रवर्ग निहाय एकूण ग्रामपंचायती व महिलांसाठी आरक्षीत ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा -  एकूण ग्रामपंचायत 66, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 12 पैकी 6 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 33 पैकी 17  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रापं 33.  चिखली -  एकूण ग्रामपंचायत 99, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21  पैकी 11 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 27 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 48 पैकी 24  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. मेहकर : एकूण ग्रामपंचायत 98, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 45 पैकी 23  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. लोणार : एकूण ग्रामपंचायत 60, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 6 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 2 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 16 पैकी 8 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 16  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 31. सिं. राजा : एकूण ग्रामपंचायत 80, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 18 पैकी 9 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 22 पैकी 11 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 39 पैकी 20  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 41. दे. राजा : एकूण ग्रामपंचायत 48, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 5 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी निरंक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 22. मलकापूर :  एकूण ग्रामपंचायत 49, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8  पैकी 4 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 24 पैकी 12  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं  25. मोताळा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11  पैकी 6 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 15  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 33. नांदुरा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11  पैकी 5 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 32 पैकी 16  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 32. खामगांव : एकूण ग्रामपंचायत 97, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21  पैकी 10 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 46 पैकी 23  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 48. शेगांव : एकूण ग्रामपंचायत 46, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 10  पैकी 5 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 12 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 23. जळगांव जामोद : एकूण ग्रामपंचायत 47, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 7  पैकी 4 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 19 पैकी 10  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. संग्रामपूर : एकूण ग्रामपंचायत 50, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8  पैकी 4 महिला,  अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 21 पैकी 10  ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. अशाप्रकारे एकूण जिल्ह्यात 870 ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 170 ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षीत आहे. त्यापैकी 85 महिला, अनुसूचित जमातीसाठी एकूण 50 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण आहे. यापैकी 25 ग्रामपंचायती महिला राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 235 ग्रा.पं सरपंच पद आरक्षण असून त्यापैकी 118 महिलांसाठी राखीव आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 415 ग्रामपंचायतींपैकी 208 ग्रा.पं सरपंच पदावर महिला आरूढ होणार आहे.

 


--

No comments:

Post a Comment