जिल्हास्तर युवा महोत्सवाचे 25 ते 26 डिसेंबर रोजी आयोजन
- महोत्सव ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने होणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालयद्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. केंद्र शासनामार्फत सन 1994 पासुन राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. याकरीता राज्यामध्ये जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा संघ निवडण्यात येतो.
त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 15 वर्ष पुर्ण व 29 वर्षाआतील वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.25 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे. सदर युवा महोत्सवामध्ये (१) एकांकींका (इंग्रजी व हिंदी), सांघीक-(2) लोकनृत्य, (3) लोकगीत, (4) शास्त्रीय वाद्य-बासरी, तबला, मृदुंग, विणा, सितार, हार्मोनियम-लाईट, गिटार, इ. (५) शास्त्रीय नृत्य-भरत नाट्यम, मनिपुरी, ओडीसी, कथक, कुचिपुडी, इ. (६) शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी, कर्नाटकी), इत्यादी कला प्रकारांचा समावेश असुन त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील कलावंतांनी आपले अर्ज दि. 23 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, क्रीडानगरी, बुलडाणा येथे सादर करावे. बाबनिहाय प्रवेश अर्जानुसार स्पर्धकांची वेळ निश्चीत करुन त्या-त्या स्पर्धकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात येतील. तसेच ज्या स्पर्धकांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील, त्यांना लिंकद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येवुन प्रथम क्रमांकाचा स्पर्धक विभागीय युवा महोत्सवाकरीता अमरावती येथे पात्र होईल. सहभागी कलावंत (स्पर्धक) यांनी आपले प्रवेश अर्ज, मोबाईल नंबर, पत्ता, संस्थेचे नांव आदींसह या कार्यालयामध्ये नोंदणी करावी. त्यानंतरच कार्यक्रमाची रुपरेषा संबंधितांना कळविण्यात येईल.
देशात कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन एकत्रीकरण करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी कळविले आहे.
**************
पिंजरा पद्धतीने करण्यात येणार मत्स्यसंवर्धन
- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, पाच पिंजऱ्यांकरीता अनुदान अनुज्ञेय
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : राज्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच पिंजऱ्यांकरीता अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. तरी या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तशी वाढ झाल्यास वाढीव पिंजऱ्यावरील अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजना पाच पिंजऱ्यांची असली, तरी एकूण 18 पिंजऱ्यांपर्यंत म्हणजे 13 पिंजरे स्वखर्चाने किंवा संपूर्ण 18 पिंजरे स्वखर्चाने जलाशयात टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याबाबत कोणत्या जलाशयात किती पिंजरे टाकण्याची तरतूद उपलब्ध आहे. याबाबतची माहिती ही संबधीत जिल्ह्याच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना या कक्षातून मिळणार आहे. पिंजरा योजनेतंर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीस अनुदान लाभ मिळू न शकल्यास स्वखर्चाने या योजनेचा लाभ घेता येणार आहे. स्वखर्चाने लाभ घेण्यास इच्छूक असल्यास तसे अर्ज करताना स्पष्ट नमूद करावे. अनुदान योजना लाभार्थी अंतिम झाल्यावर जागा उपलब्धतेनुसार सर्व विना अनुदानित पिंजरा योजनेचा अर्जदारांचा विचार करण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त स. इ. नायकवडी यांनी कळविले आहे.
*******
कोरोना अलर्ट : प्राप्त 534 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह
• 42 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 588 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 534 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 507 तर रॅपिड टेस्टमधील 27 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 534 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 17, बुलडाणा तालुका : सातगांव म्हसला 3, चिखली शहर : 12, चिखली तालुका : शेलूद 3, दे. घुबे 2, किन्होळवाडी 1, धोडप 1, नायगांव बु 1, मेरा बु 1, पळसखेड 2, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, सोनाटी 1, वाडेगांव 1, खामगांव शहर : 4, नांदुरा शहर : 3, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे पंचमुखी नगर, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 2, खामगांव : 7, दे . राजा : 15, सिं. राजा : 6, शेगांव : 5, मलकापूर : 2, चिखली : 5.
तसेच आजपर्यंत 84856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11679 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11679 आहे.
तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 84856 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12190 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11679 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 364 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 147 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
**********
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
- जिल्हाधिकारी यांना ध्वज लावून शुभारंभ
- माजी सैनिकांचे गुणवंत पाल्यांचा गौरव
बुलडाणा,(जिमाका) दि.21 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलनाचा शुभारंभ आज 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत यांनी ध्वज लावून निधी संकलन शुभारंभ केला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते माजी सैनिक प्रभाकर सवडतकर यांचा पाल्य मनिष व माजी सैनिक समाधान दराडे यांची पाल्या कु. शिवानी यांना इयत्ता 10 वी मध्ये गुणवत्ता यादी विशेष स्थान प्राप्त केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून प्राप्त प्रशस्तीपत्र व धनाकर्ष देऊन गुणवंतांना गौरविण्यात आले.
यावर्षी कोविड साथरोग लक्षात घेता सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम कमी उपस्थितीत व मर्यादीत स्वरूपात घेण्यात आला. मागील वर्षी जिल्ह्यास शासनाने 48 लक्ष 38 हजार रूपयांचे ध्वजदिन निधी संकलीत करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र कोरोनामुळे जिल्ह्यास प्राप्त उद्दिष्टांपैकी 80 टक्के उद्दिष्ट जिल्ह्याने पुर्ण केले आहे. यावर्षी शासनाने जिल्ह्यास दिलेले 48 लक्ष 38 हजाराचे उद्दिषष्ट 100 टक्के पुर्ण किंवा त्यापेक्षा जास्त पुर्ण करण्यात येणार आहे. सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व कुटूंबियांच्या काही अडचणी असतील, त्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेमार्फत सोडवाव्यात. तसेच याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व विभाग सहकार्य करतील, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
************
डिएलएड प्रथम वर्षासाठी आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
- शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेशासाठी विशेष फेरी
- www.maa.ac.in या संकेत स्थळावर 26 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
बुलडाणा,(जिमाका) दि.21 : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिकत् असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. याबाबत सविस्तर सुचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी. खुल्या प्रवर्गासाठी 49.50 टक्के व इतर संवर्गासाठी 44.50 टक्के गुण आवश्यक आहेत.
प्रवेश अर्ज 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन भरण्यात येणार आहे. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त 22 ते 27 डिसेंबर 2020 पर्यंत करण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या संवर्गासाठी 200 व इतर संवर्गाकरीता 100 रूपये आहेत. यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून ॲप्रोव करून घेतला आहे. मात्र प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरूस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रोव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉग ईन मधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत: इमेल / लॉगईन मधून प्रिंट घ्यावी. त्यानंतरच अध्यापक विद्यालयात चार दिवसांच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर प्रवेशासाठी कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment