कोविड लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे
- जिल्हाधिकारी
- कोरोना लसीकरण तयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक
- सर्व खाजगी डॉक्टर, स्टाफ यांची नोंदणीक करावी
- निवडणूकीच्या धर्तीवर राहणार लसीकरण कार्यक्रम
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. याबाबत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नियमित तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहणार आहे. तरी या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी सादरीकरण केले. सादरीकरणावेळी ते म्हणाले, लसीकरण टप्पेनिहाय करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खाजगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी - कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात 50 वर्षाच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणासाठी को विन ॲपवर नोंदणी आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टर, नर्सेस त्यांचा स्टाफ, यंत्रणेतील हेल्थ वर्कर, पोलीस, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नोंदणी करावी. नोंदणीसाठी महसूल यंत्रणेने पुढाकार घ्यावा. आपआपल्या तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरची नोंदणी होईल, याची काळजी घ्यावी.
तसेच लसीकरण स्थळ हे तीन भागात असावे. यामध्ये पहिल्या भागात प्रतीक्षा खोली, दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लसीकरण खोली, तर तिसऱ्या भागात निरीक्षण खोली असणार आहे. निरीक्षण खोलीमध्ये 30 मिनीटापर्यंत लसीकरण केलेल्या व्यकतीला ठेवण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर तारिख, स्थळ व वेळेचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. एसएमएस दाखविल्यानंतर लसीकरण बुथमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याठिकाणी ओळखपत्र तपासण्यात आल्यानंतर लसीकरणासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या डोससाठी एसएमस पाठविण्यात येणार आहे. लसीकरणानंतर एसएमएसमध्ये एक लिंक येणार असून त्यामधून प्रमाणपत्र जनरेट होणार आहे. प्रत्येक लसीकरण स्थळ लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर सॅनीटाईज करण्यात येणार आहे. लसीकरण स्थळ हे समाज मंदीर, शाळा, मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, एखादी खाजगी जागा असणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. लस ही इंजेक्टीबल असून डिस्पोजेबल सिरींजची असणार आहे. ही सिरींज एकावेळी एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण स्थळामध्ये कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सोशल डिस्टसिंगचे कडक पालन करण्यासाठी त्यापद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर वेस्ट मॅनेजमेंटचीही व्यवस्था असणार आहे. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिक्षक, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना अलर्ट : प्राप्त 493 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 5 पॉझिटिव्ह
• 52 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 498 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 493 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 421 तर रॅपिड टेस्टमधील 72 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 493 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 2, जळगांव जामोद शहर : 2, लोणार शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 5 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 52 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : 10, बुलडाणा : अपंग विद्यालय 8, आयुर्वेद महाविद्यालय 1, दे. राजा : 5, खामगांव : 5, नांदुरा : 3, चिखली : 11, मेहकर : 1, चिखली : 6, जळगांव जामोद : 2,
तसेच आजपर्यंत 88018 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12069 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12069 आहे.
तसेच 1327 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 88018 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12441 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12069 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 222 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 150 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
दुध उत्पादक संघ, कंपनी, शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड लाभ देण्यासाठी विशेष मोहिम
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : जिल्ह्यात शेतकऱ्यांकरीता शेती सोबत जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेळी व मेढी पालन, कुक्कुटपालन, व्यवसाय प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामध्ये अल्प अंत्यल्प भुधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांचा कल या व्यवसायाकडे वाढल्याने दिसुन येत आहे. केंद्रशासन व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाने सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीड कार्डची सुविधा (केसीसी) उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहकारी दुध सोसायटी, दुधसंघ, दुध उत्पादन कंपनीच्या सभासद असलेल्या दुध उत्पादन शेतकरी व पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक
केसीसी कार्ड योजनेचा लाभ देणेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेच्या पहील्या टप्प्यात सहकारी दुध सोसायटी, दुधसंघ, दुध उत्पादक कंपनीच्या सभासद असलेल्या दुध उत्पादक शेतकरी व पशुपालक ज्यांचेकडे किसान क्रेडीड कार्ड नाही त्यांना पशुसंवधर्न विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ प्रथम देण्यात येईल. ज्या दुध उतपाक शेतकऱ्यांकडे शेती असून त्यांचेकडे किसान क्रेडीड कार्ड असेल तर त्यांना किसान क्रेडीड कार्डची पत मार्यादा वाढवून मिळेल, परंतु व्याज सवलत रुपये 3.00 लक्ष पर्यंतच्या कर्जासाठी राहील. कर्जाकरीता व्याज सवलत दर 2 टक्के राहील. तर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ देण्यात येईल. सर्वासाधारणपणे कोणत्याही तारणाशिवाय पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीड कार्ड कर्ज मर्यादा (खेळते भांडवल) रुपये 1.60 लक्ष आहे. परंतु जो पशुपालक शेतकरी सहकारी दुध सोसायटी, दुधसंघ, दुध उत्पादक कंपनीशी संलग्न आहे आणि कर्ज परत करण्याची त्रिपक्षिय करार (दुध सोसायटी, संघ, बँक आणि शेतकरी) यांच्याकडून कर्ज परत करण्याची हमी देत असेल. त्यांना कोणत्याही तारणा शिवाय रुपये 3.00 ला च्या मर्यादेत पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदी करीता नसुन त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे.
तसेच सद्यास्थित राज्यातील 17.87 लक्ष शेतकरी पशुपालक हे राज्यातील 72 दुध संघशी संलग्न आहेत. या पशुपालक शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीड कार्ड योजनेचा लाभ देण्याचा अपेक्षित असून सद्यास्थितीत राज्यातुन 2.58 लक्ष सहकारी दुध सोसायटी दुध संघाकडील पशुपालक शेतकऱ्यांनी विविध बॅकाकडे किसान क्रेडीड कार्डसाठी अर्ज सादर केले असून बँकस्तरावर मोठया प्रमाणात अर्ज काही कारणामुळे प्रलंबित ठेवले किंवा नाकारले जात आहे.
शेतकऱ्यांनी अपुर्ण भरलेले अर्ज, केसीसी अंतर्गत कडबाकुटी यंत्रव पशुधन खरेदीसाठी केलेले अर्ज, काही केसीसी धारकांनी कर्जाची रुपये 3.00 लक्ष पर्यंतची मर्यादा पुर्ण केलेली असल्याने, काही दुधसंघ त्रिपक्षिय करार करण्यास तयार नसलेले. (दुध सोसायटी, संघ, बँक, आणि शेतकरी, ज्याबँकध्ये पशुपालकांचे दुधचे पैसे जमा केले जातात त्याच बँकमध्ये केसीसीचे अर्ज सादर न केल्याने अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment