डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन
- कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
- मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
- व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 7 डिसेंबर रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील,
********
बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची अंमलबजावणी
- समुदाय आधारीत संस्था, संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून अर्ज आमंत्रित
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत राज्यातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. मूल्यसाखळी विकासाचे भागीदारी उपप्रकल्प व बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहे. स्मार्ट प्रकल्पामध्ये समुदाय आधरीत संस्था अर्ज करू शकतात. त्यामध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्थापीत प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापीत लोकसंचालीत साधन केंद्र यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेट्स, प्रक्रियादार, निर्यातदार, लघु मध्यत उद्योजक, स्टार्ट अप्स खातेदारही अर्ज करू शकतात.
समुदाय आधारीत संस्थांनी संस्थेचे नाव व पत्ता नोंदणी पत्रानुसार द्यावा. जबाबदार संचालकाचे नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी, जबाबदार व्यवस्थापकाचे नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी, समुदाय संस्था नोंदणी क्रमांक, नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी / गटाकडे जमा झालेले भाग भांडवल, भागधारक व बिगर भागधारकांची संख्या, भागधारकांचा जमिन, लिंग वर्गवारी, सामाजिक वर्गवारीचा तपशील, समुदाय आधारीत संस्थेच्या संचालक मंडळाचा तपशील, मागील तीन वर्षाचा आर्थिक तपशील, संस्थेमधील भागधारक, बिगर भागधारक सदस्यांचा मागील तीन वर्षातील प्रमुख पिक उत्पादनाचा तपशील, गट/ कंपनी मधील भागधारक, बिगर भागधारकांकडील विक्री योग्य शेतमाल व संस्थेमार्फत संकलीत केलेला मागील तीन वर्षातील शेतमाल तपशील, गट / कंपनीच्या मालकीच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण, सदस्यांची एकत्रित प्रमुख तीन पिकांची सद्यस्थिती मधील विक्री व्यवस्थेचा तपशील देण्यात यावा.
केवळ उत्पादक भागीदारी उपप्रकल्पकरीता समुदाय आधारीत संस्थेने निवडलेल्या पिकांचा तपशील, संस्थात्मक खरेदीदार निश्चित असल्यास सामंजस्य कराराचा नमुना द्यावा. केवळ बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पाकरीता समुदाय आधारीत संस्थेने नवीन बाजारपेठेचा तपशील सोबत द्यावा. उत्पादक भागीदारी प्रकल्पाकरीता खरेदीदाराने अर्जासोबत आपले नाव, संस्था/ खरेदीदाराचे प्रकार, नोंदणी क्रमांक, नोंदणी प्रमाणपत्र, संपूर्ण पत्ता, संपर्क पत्ता, उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा तपशील, सनदी लेखापरिक्षकाच्या अहवालानुसार वार्षिक उलाढाल तपशील, मागील तीन वर्षातील खरेदी केलेल्या शेतमालाचा तपशील व संभाव्य खरेदी, संस्थेकडून प्रस्तावित खरेदी, संक्षिप्त माहिती, नविन संकल्पना व अपेक्षा आदींची माहिती द्यावी. स्मार्ट प्रकल्पातंर्गत अर्ज नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण असल्यास संबंधीत तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचेसोबत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
**********
कोरोना अलर्ट : प्राप्त 286 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह
• 87 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 309 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 286 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 18 व रॅपीड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 215 तर रॅपिड टेस्टमधील 71 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 286 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 2, नांदुरा शहर : 3, चिखली शहर : 2, चिखली तालुका : अमडापूर 2, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 2, मलकापूर शहर : 1, दे. राजा : पिंपळगांव हुडा 1, शेगांव शहर : 3, मूळ पत्ता अकोला 2, जळगांव खांदेश येथील 5 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 23 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा येथील अपंग विद्यालय कोविड केअर सेंटर येथे शिवशंकर नगर, बुलडाणा येथील 57 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 87 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 16, बुलडाणा : अपंग विद्यालय 5, आयुर्वेद महाविद्यालय 8, दे.राजा :6, सिं. राजा : 14, चिखली : 10, लोणार : 6, जळगांव जामोद : 3, नांदुरा : 19.
तसेच आजपर्यंत 77289 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10947 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10947आहे.
तसेच 1395 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 77289 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11456 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10947 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 372 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 137 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*****
सरपंच आरक्षण सोडतसाठी लोणार येथे सभेचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : लोणार तालुक्यातील सन 2020 ते 2025 दरम्यान सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता आरक्षण सोडत (महिला आरक्षण वगळून) तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी, लोणार यांचे अध्यक्षतेखाली सोमवार, दि. 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता तहसिल कार्यालय, लोणार येथे सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील यामधील महिलांसाठी जागांची सोडत जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. तरी कोविड 19 बाबत सोशल डिस्टसिंगचे पालन करून संबंधीत इच्छुकांनी सदर सोडतीस हजर रहावे, असे आवाहन तहसिलदार लोणार यांनी केले आहे.
मतदार यादीतील नाव वगळणे व समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिम
- मतदार यादीवर आक्षेप असल्यास 7 दिवसात नोंदवावे
- मेहकर तहसिलदार यांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीचे पुर्ननिरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ट करणे, दुरूस्ती करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे मेहकर तालुक्यायतील ज्या मतदारांचा फोटो मतदार यादीत नाहीत, ते मतदार मागील अनेक वर्षापासून सदर पत्यावर राहत नाही. काही मतदार मयत झाल्याबाबत अहवाल बीएलओ यांनी तहसिलदार, मेहकर या कार्यालयात दाखल केलेले ओहत. जे मतदार मयत झालेले आहेत, जे मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. अशांचा बीएलओ मार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार मतदार नोंदणी 1960 चे नियम 21 नुसार सदर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया आयोगाच्या कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात येणार आहे.
तरी नावे वगळण्यात येणाऱ्या मतदारांची यादी ही उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर तहसिल कार्यालय मेहकर व सर्व मतदान केंद्र याठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत असून ज्या मतदारांची फोटो नाहीत. त्यांनी त्यांचे फोटो व सदरील यादीतील नाव वगळण्यास आक्षेप असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा लेखी आक्षेप मतदार केंद्रस्तरीय अधिकारी व निवडणूक विभाग, तहसिल कार्यालय, मेहकर येथे 7 दिवसांत दाखल करावे. अन्यथा कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास मतदार नोंदणी नियम 1960 चे नियम 21 नुसार कार्यवाही अनुसरण्यास येईल, याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मेहकर तहसिलदार डॉ संजय गरकल यांनी केले आहे.
सरपंच आरक्षण सोडतसाठी बुलडाणा येथे सभेचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : बुलडाणा तालुक्यातील सन 2020 ते 2025 दरम्यान सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता आरक्षण सोडत (महिला आरक्षण वगळून) तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी, बुलडाणा यांचे अध्यक्षतेखाली सोमवार, दि. 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता तहसिल कार्यालय, बुलडाणा येथे सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील यामधील महिलांसाठी जागांची सोडत जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. तरी कोविड 19 बाबत सोशल डिस्टसिंगचे पालन करून संबंधीत इच्छुकांनी सदर सोडतीस हजर रहावे, असे आवाहन तहसिलदार बुलडाणा यांनी केले आहे.
*****
हरकती व दावे स्वीकारण्यासाठी
5 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयात विशेष व्यवस्था
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे राज्यातील 14 हजार 223 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आयोगाने शुक्रवार दि. 25 सप्टेंबर 2020 हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक अधिसुचीत करण्यात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 1 डिसेंबर 2020 हा होता. हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2020 पर्यंत आहे. प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी 10 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हरकती व सुचना स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये दिनांक 5 डिसेंबर व 6 डिसेंबर 2020 रोजी शनिवार, रविवार शासकीय सुट्टीचे दिवस येत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे 4 डिसेंबर 2020 चे निर्देशानुसार शनिवार 5 डिसेंबर या दिवशी कार्यालयीन वेळेत हरकती व सुचना स्वीकारण्यासाठी तहसिल कार्यालयात विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment