कोरोना अलर्ट : प्राप्त
483 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 32 पॉझिटिव्ह
• 31 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या
व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 515 अहवाल प्राप्त
झाले आहेत. यापैकी 483 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त
आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील
1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 390 तर रॅपिड
टेस्टमधील 93 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 483 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा तालुका : पिं. देवी 1, दे. राजा शहर : 8,
सिं. राजा तालुका : वडजी 3, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, पातुर्डा 1, शेगांव शहर : 2, नांदुरा तालुका : खातखेड 2,
पिंप्री अढाव 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : गोंधनपूर 1, गारडगांव 1, बुलडाणा
शहर : 5, बुलडाणा तालुका : शिरपूर 1,सागवन 1, ढासाळा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यात 32 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 31 रूग्णांनी कोरोनावर मात
केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी
देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली
: 11, बुलडाणा : अपंग विद्यालय 3, स्त्री रूग्णालय 8, आशिर्वाद कोविड हेल्थ सेंटर
9.
तसेच
आजपर्यंत 89229 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12140
कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या
12140 आहे.
तसेच 1686
स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 89229
आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12518 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12140 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात
सध्या रूग्णालयात 227 कोरोना बाधीत
रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत
151 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
खरीप हंगामातील अंतिम
पीक पैसेवारी जाहीर
·
जिल्ह्यातील अंतिम पीक पैसेवारी 46
पैसे
बुलडाणा,(जिमाका) दि.31 : खरीप हंगाम सन 2020-21 मधील
जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याची अंतिम
पीक पैसेवारी 46 पैसे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1419 गावांची अंतिम पीक
पैसेवारी 50 पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्याची तालुकानिहाय अंतिम पीक पैसेवारी पुढीलप्रमाणे
आहे. तालुकानिहाय गावांची संख्या व अंतिम पीक पैसेवारी : बुलडाणा – गावे 98, अंतिम पीक पैसेवारी 48 पैसे,
चिखली : गावे 144, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, दे. राजा : गावे 64, अंतिम पीक
पैसेवारी 48 पैसे, मेहकर : गावे 161, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, लोणार : गावे 91,
अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे, सिं. राजा : गावे 114, अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे,
मलकापूर : गावे 73, अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे, मोताळा : गावे 120, अंतिम पीक
पैसेवारी 47 पैसे, नांदुरा : गावे 112, अंतिम पीक पैसेवारी 44 पैसे, खामगांव :
गावे 145, अंतिम पीक पैसेवारी 47 पैसे,
शेगांव : गावे 73, अंतिम पीक पैसेवारी 46 पैसे, जळगांव जामोद : गावे 119, अंतिम
पीक पैसेवारी 37 पैसे आणि संग्रामपूर तालुक्यात गावे 105 व अंतिम पीक पैसेवारी 47
पैसे आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 1419 गावांची 50 पैशाच्या आत अंतिम पीक
पैसेवारी 46 पैसे आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले
आहे.
*******
कोविड साथरोगावर
नियंत्रणासाठी शासनाचे निर्बंध व सूट 31 जानेवारी पर्यंत लागू
बुलडाणा,(जिमाका) दि.31 : कोरोना विषाणू अर्थात कोविड
साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या
आहेत. त्यानुसार 29 डिसेंबर 2020 च्या शासन आदेशानुसार जिल्ह्यासाठी शासनाकडून
वेळोवेळी शिथिल करण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी 31 जानेवारी
2021 पर्यंत लागू करण्यात आलेल्या ओहत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक
उपाययोजना राबविण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी आदेश, निर्देश व नियमावली निर्गमीत
करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 31
जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी लागू असणार आहे. सदर
आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता 1860 व आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदींनुसार शिक्षेस पात्र असणार आहे,
असे जिल्हादंडाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी कळविले आहे.
**********
ग्रामपंचायतच्या 4 हजार
809 जागांसाठी 13 हजार 625 अर्ज दाखल
- एकूण उमेदवारांची
संख्या 13 हजार 362
बुलडाणा,(जिमाका) दि.31 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे वारे जोमाने वाहत आहेत. निवडणूक
लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी काल 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. निवडणूक
आयोगाने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन अर्जही सादर करण्याची मुभा दिली होती. तसेच वेळही
वाढवून देण्यात आली. त्याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी
उमेदवारी अर्जांचा धो.. धो पाऊसच पडला. जिल्ह्यात 13 हजार 362 उमेदवारांकडून तब्बल
13 हजार 625 अर्ज दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात
एकूण 527 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी 23 डिसेंबर पासून
अर्ज सादर करणे सुरू झाले. तर 30 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारिख
होती. जिल्ह्यात तालुकानिहाय निवडणूक ग्रामपंचायती, एकूण अर्ज व उमेदवार संख्या : बुलडाणा – ग्रामपंचायती 51, उमेदवार 1572 व अर्ज 1609, चिखली : ग्रामपंचायती 60, उमेदवार 1447 व अर्ज 1487, दे. राजा :
ग्रामपंचायती 26, उमेदवार 597 व अर्ज 648,
सिं. राजा : ग्रामपंचायती 43, उमेदवार 956
व अर्ज 992, मेहकर : ग्रामपंचायती 41,
उमेदवार 1153 व अर्ज 1162, लोणार : ग्रामपंचायती
16, उमेदवार 424 व अर्ज 425, खामगांव : ग्रामपंचायती 71, उमेदवार 1804 व अर्ज 1843, शेगांव :
ग्रामपंचायती 34, उमेदवार 800 व अर्ज 816,
जळगांव जामोद : ग्रामपंचायती 25, उमेदवार 654
व अर्ज 661, संग्रामपूर : ग्रामपंचायती 27,
उमेदवार 742 व अर्ज 742, मलकापूर : ग्रामपंचायती
33, उमेदवार 757 व अर्ज 757, नांदुरा : ग्रामपंचायती 48, उमेदवार 1184 व अर्ज 1188 आणि मोताळा :
ग्रामपंचायती 52, उमेदवार 1272 व अर्ज 1295.
अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 13 हजार 362
उमेदवारांकडून 13 हजार 625 अर्ज दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी
निवडणूक असणाऱ्या 16 ग्रामपंचायती लोणार तालुक्यात आहे. तसेच उमेदवार संख्याही 424
व अर्ज 425 आहे. सर्वात जास्त उमेदवार संख्या 1804 खामगांव तालुक्यात असून अर्ज 1843
आहेत.
****
विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे
- समाज कल्याण
विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि. 31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास
व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत
सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ
देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahadbt.mahait.gov.in
या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
तरी सन
2020-21 या वर्षाकरीता प्रवेशीत सर्व
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली
कार्यान्वीत करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या
वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील
विद्यार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्याकरीता मुदत देण्यात आली असून
या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे
अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी
केले आहे.
******
No comments:
Post a Comment