ग्रामपंचायत निवडणूकीत आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे
- जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
- ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. गवागावात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. प्रभागनिहाय उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आदर्श आचार संहीतेचे पालन महत्वाचे आहे. तरी या निवडणूकीत आदर्श आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक उपस्थित होते. तर सभागृहात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश लोखंडे, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींसह संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती म्हणाले, याबाबत सुचना मिळाल्यानुसार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. तसेच पोलीस यंत्रणेने संवेदनशील गावांमध्ये सदर निवडणूक शांततापूर्वक मार्गाने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून निवडणूका यशस्वीरित्या पार पाडाव्यात. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी काळजी घ्यावी.
बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
********
कोरोना अलर्ट : प्राप्त 363 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 46 पॉझिटिव्ह
• 106 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 409 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 363 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 46 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 44 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 297 तर रॅपिड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 363 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 5, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : पिंप्री गवळी 1, चिखली तालुका : पळसखेड दौलत 1, सातगांव भुसारी 1, सावरखेड 1, सोनेवाडी 1, चिखली शहर : 6, दे. राजा तालुका : दे मही 2, सिनगांव जहागीर 1, दे. राजा शहर : 2, जळगांव जामोद तालुका : जामोद 5, जळगांव जामोद शहर : 5, मेहकर तालुका : मोहाडी 1, लोणी गवळी 1, मेहकर शहर : 1, खामगांव तालुका : दधम 1, खामगांव शहर : 6, नांदुरा शहर : 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 46 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 106 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा : 14, दे. राजा : 12, चिखली : 9, जळगांव जामोद : 1, मोताळा : 3, सिं. राजा : 23, शेगांव : 10, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, आयुर्वेद महाविद्यालय 1, खामगांव : 12, लोणार : 1, मेहकर : 7.
तसेच आजपर्यंत 82101 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11510 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11510 आहे.
तसेच 1776 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 82101 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11944 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11510 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 290 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 144 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***
भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेचे 23 डिसेंबर रोजी आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा दि. 23 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबत तक्रारी किंवा गऱ्हाणी दाखल करायच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समिती समोर दाखल करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment