Tuesday, 22 December 2020

DIO BULDANA NEWS 22.12.2020

 इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार

  • अनुसुचित जमाती प्रवर्गाचा विद्यार्थी असावा

बुलडाणा,(जिमाका) दि.22 :प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअकोला अंतर्गत येत असलेल्या जिल्हयातील अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्याकत येणार आहे.  लाभ घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडुन  प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध आहेत.

तरी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन  तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख 10 फेब्रुवारी 2021 आहे. तसेच इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री  ध्ये प्रवेश घेण्यासाठी  विद्यार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असावा. तसेच पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा. या योजनेचा लाभ घेउु इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा  लाख च्या आत असणे आवश्यक आह. तहसिलदाराचे प्रमाणपत्र असावे.  इयत्ता ली प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून  ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या विदयार्थाचे पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे. आदिम जमातीच्या विदयार्थाची तसेच विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या व दारिद्र रेषेखालील  कुटूंबातील अनुसूचीत जमातीच्या विदयार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.

  विदयार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईलया योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल. वर्ग 2 साठी शिकत असलेल्या शाळेमधल मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत विदयार्थाची जोडावी. अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे ममता विधळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

                                                **************

राज्यामध्ये जिल्ह्याची मका खरेदी अव्वल..!

  • शेतकऱ्यांच्या खात्यात खरेदीपोटी 15 कोटी रूपये जमा

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी भावाने मका, ज्वारी, बाजरी खरेदी सुरु आहे. आतापर्यत मका खरेदीसाठी 11331 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 4 हजार 577 शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 हजार 788 शेतकऱ्यांनी 1 लक्ष 40 हजार 925 क्विंटल मका खेरदी करण्यात आलेला आहे. सदर खरेदीची रक्कम रुपये 26.7 कोटी असुन त्यापैकी 15 कोटी रक्कम ही ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. राज्यात मका खरेदीबाबत जिल्ह्याने राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मका खरेदी जिल्ह्याची झाली आहे.

              तसेच जिल्ह्यामध्ये ज्वारी खरेदीसाठी 2 हजार 737 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 1647 शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी  एसएमएस पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 1 हजार 282 शेतकऱ्यांची 17 हजार 122 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे. सदर खरेदीची रक्कम रुपये 4.48 कोटी असून त्यापैकी 2 कोटी रक्कम ही ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सहकार्यामुळे राज्यामध्ये जिल्ह्याची अव्वल स्थानावर खरेदी होवू शकली आहे. शासनाने मका खरेदीची मुदत दि. 31 डिसेंबर 2020 दिलेली असली तरी राज्यातील मार्केटिंग फेडरेशनला केंद्रशासनाने दिलेले उद्दिष्ट पुर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद झाले असल्याने शासनाने पुढील आदेशापर्यत मका खरेदी बंद राहणार आहे. पुढील आदेश प्राप्त होताच मका खरेदी सुरु करण्यात येईल. मात्र ज्वारीच्या खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण न झाल्याने ज्वारीची खरेदी दि. 31 डिसेंबर 2020 पर्यत सुरु राहणार आहे, असे जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                *******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 172 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 37 पॉझिटिव्ह

•       40 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 209 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 172 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 94 तर रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 172 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : शेलसूर 1, शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : भोनगांव 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आडोळ बु 2, मडाखेड 2, मलकापूर शहर : 1, नांदुरा तालुका : आलमपूर 4, नांदुरा शहर : 1, चिखली तालुका : अंचरवाडी 1, अंत्री खेडेकर 1, कोलारा 1, नायगांव 1,  चांधई 1, दहीगांव 1,  चिखली शहर : 2,  मोताळा शहर : 1, दे. राजा शहर : 2, खामगांव शहर : 3,  मूळ पत्ता चिंचवड, पुणे 1, जळगांव खांदेश येथील 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 40 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 12, दे . राजा : 4, सिं. राजा : 8, बुलडाणा : अपंग विद्यालय 9, आयुर्वेद महाविद्यालय 3, मेहकर : 4.  

तसेच आजपर्यंत 85028 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11719 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11719 आहे. 

  तसेच 1071 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 85028 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12227 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11719 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 361 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 147 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबर रोजी वेबिनारचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे 24 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने लोकसंवाद अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईद्वारा 24 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचा विषय ग्राहक संरक्षण कायदा 2019 नवीन स्वरूप हा आहे. या वेबीनारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम, विभागाचे सचिव विलास पाटील, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव, ग्राहक न्यायालय विधिज्ञ संस्थचे अध्यक्ष उदय वारूंजीकर, आयोगाचे सदस्य, मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी युट्यूब चॅनेल https://youtube/ts5DOIWQV_M या लिंकवर क्लिक करावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                                                *****


No comments:

Post a Comment