पक्क्या लायसन्सच्या चाचणीकरीता कोटा उपलब्ध
- 31 डिसेंबर 2020 पर्यंत सकाळी 8 वाजेपासून मिळणार कोटा
बुलडाणा,(जिमाका) दि.24 : कोविड 19 च्या कारणामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे परिवहन आयुक्त यांच्या सुचनेनुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत लर्निंग लायसन्सची विधीग्राह्यता वाढविण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत अशा विधीग्राह्यता समाप्त होत असलेल्या लायसन्सची संख्या लक्षात घेता अशा नागरिकांना व अर्जदारांना अपॉईंटमेंट उपलब्ध नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून 24 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पक्क्या लायसन्सच्या चाचणीकरीता सकाळी 8 वाजल्यपासून कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची नोंद शिकाऊ अनुज्ञप्तीधारक विधीग्रह्यता वाढविण्यात आलेल्या व्यक्तींनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
कोरोना अलर्ट : प्राप्त 378 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 43 पॉझिटिव्ह
• 45 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 421 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 378 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 314 तर रॅपिड टेस्टमधील 64 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 378 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, शेगांव शहर : 13, खामगांव शहर : 5, दे. राजा शहर : 5, चिखली शहर : 1, चिखली तालुका : शिंदी हराळी 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा खुर्द 1, मलकापूर शहर : 3, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : दाभाडी 1, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : खैरा 1, लोणार तालुका : गोत्रा 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 11, जळगांव जामोद : 3, मेहकर : 1, शेगांव : 2, सि. राजा : 4, नांदुरा : 6, दे .राजा : 2, खामगांव : 12, चिखली : 7,
तसेच आजपर्यंत 85670 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11816 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11816 आहे.
तसेच 1167 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 85670 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12309 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11816 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 345 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 148 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सुट्टीच्या दिवशी स्वीकारणार
- ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जात पडताळणी कार्यालय राहणार सुरू
बुलडाणा,(जिमाका) दि.24 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा कार्यालय ग्रामपंचायत निवडणूकीचे जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सुट्टीच्या दिवशीही स्वीकारणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक सन 2020-21 या कालावधीत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज पडताळणी कार्यालयास प्राप्त होत आहे. सदर अर्ज स्वीकृतीची शेवटची मुदत 30 डिसेंबर 2020 आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय 25, 26 व 27 डिसेंबर 2020 या शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू असणार आहे. या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. जेणेकरून कोणताही ग्रामपंचायत उमेदवार विहीत मुदतीत सदर प्रस्ताव जात पडताळणी कार्यालयास सादर करण्यापासून वंचित राहणार नाही. तरी ग्रामपंचायत निवडणूकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी केले आहे.
'राष्ट्रीय युवा संसद' मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!
- नेहरू युवा केद्राव्दारा 28 व 29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन
- नेहरू युवा केंद्राचेवतीने आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.24 : तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातंर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्राव्दारा राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे. तर राष्ट्रीय स्तरावर प्रथम बक्षीस 2 लाख, द्वितीय 1.5 लाख, तृतीय बक्षीस 1 लाख रूपये आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तर राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतच स्पर्धा राहणार आहे.
स्पर्धेचे विषय राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 भारत में शिक्षा को बदल देगी, उन्नाव भारत अभियान - समुदायों की शक्ति को उजागर करना और उनके उत्थान के लिए प्रौद्योगिकियों का उपयोग करना, नए सामान्य होने की सूरत में ग्रामीण अर्थव्यवस्था को खोलना, शून्य बजट प्राकृतिक खेती किसानों के लिए एक वरदान है हे आहेत. जिल्हास्तरीय विजेता स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व राज्यस्तरीय विजेता स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेकरीता पात्र राहील.
बुलडाणा जिल्ह्याची युवा संसद दि.28 आणि 29 डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी पुरावा, पासपोर्ट फोटोसह विहीत नमुन्यातील अर्ज नेहरू युवा केंद्र, बुलडाणा कार्यालयात दि.27 डिसेंबर 2020 पर्यंत जमा करावे . अधिक माहितीसाठी फोन क्र.07262-295332 किंवा qnykbuldana@gmail.com यावर संपर्क साधावा. जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने संसद घेण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment