Thursday, 3 December 2020

DIO BULDANA NEWS 3.12.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 406 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 44 पॉझिटिव्ह

•       26 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 450 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 406 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 36 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 306 तर रॅपिड टेस्टमधील 100 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 406 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : पांगरी 1, पिंपळगांव 2, सागवन 1,  बुलडाणा शहर : 2, मेहकर तालुका : डोणगांव 1, नांदुरा शहर : 1,  नांदुरा तालुका : शेंबा बु 2,  खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : धामणगांव देशमुख 1,  मलकापूर शहर : 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : मिसाळवाडी 1, दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : दे. मही 1, नागणगांव 1,  सिं. राजा शहर : 4, सि.राजा तालुका : सावखेड तेजन 2, जळपिंपळगांव 1, जळगांव जामोद तालुका : निंभोरा 1, जळगांव जामोद शहर : 7, शेगांव शहर : 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 26 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 3,  दे.राजा : 17, मोताळा : 1, सिं.राजा : 1, खामगांव : 4.

तसेच आजपर्यंत 77003 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10860 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10860 आहे. 

  तसेच 1123 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 77003 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11433 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10860 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 437 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 136  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*****

सरपंच आरक्षण सोडतसाठी मलकापूर येथे सभेचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.3 : मलकापूर तालूक्यातील एकूण 49 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील पदासाठीचे आरक्षण निश्चित करण्याकरिता तहसिलदार, मलकापुर यांचे

अध्यक्षेखाली तहसिल कार्यालय, मलकापुर येथे दि. 7 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढण्यासाठी सभा

आयोजित केली आहे.

    त्याकरीता सर्व इच्छूकांनी प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय, मलकापुर येथे उपस्थित राहावे. तसेच वरील आरक्षण निश्चित झाल्यानंतर सर्व प्रवर्गातील महिलासाठी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षाणाची सोडत बुलडाणा येथे जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि. 10 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली सोडत काढण्यासाठी सभा आयोजित केली आहे. त्याकरिता सर्व संबंधित इच्छूकांनी उपस्थित रहावे. तसेच सर्व उपस्थितांनी कोव्हिड -19 संबंधी दिलेल्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करावे, असे आवाहन मलकापुर तहसिलदार कु. स्वप्नाली डोईफोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

अनुकंपा धारकांना सेवा ज्येष्ठता यादीवर लेखी आक्षेप नोंदविण्यास मुदतवाढ

बुलडाणा,(जिमाका) दि.3 : जिल्हा परिषद कार्यालयाचे पत्र  दि. 18 नोव्हेंबर 2020 नुसार अनुकंपा धारकांचे तात्पुरत्या यादीवर उमेदवारांकडून दि. 2 डिसेंबर 2020 पर्यत लेखी आक्षेप, हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. तसेच अनुकंपाधारक उमेदवारांनी सन 2020 चे तात्पुरती जेष्टता यादी दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत लेखी आक्षेप, हरकती सादर करण्याकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे,  असे जि. प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

********



महाआवास अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

  बुलडाणा,(जिमाका) दि.3 :  राज्य शासनाने 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या काला वधीसाठी महा आवास अभियान जाहीर केले आहे. या अभियानानुसार जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज 3 डिसेंबर 2020 रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेला गुगल मिटद्वारे ऑनलाईन पद्धतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार महोदय सहभागी झाले होते. तसेच सभागृहात यावेळी  जि.प अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, जि.प उपाध्यक्षा सौ. कमलताई बुधवत, कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई राठोड, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

    कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी जि.प अध्यक्षा मनिषा पवार म्हणाल्या, अभियान राबविणे ही केवळ औपचारीकता नाही. प्रत्येकाने अभियानात सक्रीय सहभाग घेवून प्रभावीपणे अभियान राबवावे. अभियान काळात प्रलंबित घरकुलांची कामे पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार होतील, याकडे लक्ष द्यावे. अभियानात सर्वच तालुक्यांनी उल्लेखनिय कामगिरी करीत जिल्ह्याचे नाव राज्यात अग्रणी ठेवावे. जि. प मुकाअ श्रीमती विसपुते यांनी अभियान हे केवळ संख्यात्मक द्ष्टीने न राबविता गंभीरतेने राबविण्याचे आवाहन केले. जे तालुके मागे आहेत, त्यांनी पुर्ण ताकदीनिशी अभियान काळात घरकुल योजनेत काम पूर्ण करावे. लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक राजेश लोखंडे यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय चोपडे यांनी पीपीटीद्वारे अभियानाचे सादरीकरण केले. त्यांनी अभियानातील उपक्रम, उद्दिष्टे यांची माहिती दिली.   अभियानातंर्गत 5 ते 12 डिसेंबर दरम्यान तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तायडे यांनी केले. कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. कांबळे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच गुगल मिटद्वारे ऑनलाईन पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

****

No comments:

Post a Comment