निवृत्ती वेतन धारकांना हयातीचा दाखल सादर करण्यास मुदतवाढ
- 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत अंतिम मुदत
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : निवृत्ती वेतन नियमित मिळण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाचेवतीने संबंधित बँकेच्यामार्फत हयातीचा फॉर्म भरून घेतल्या जातो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याकारणाने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी आता निवृत्ती वेतन धारक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत संबंधीत बँक शाखेत हयातीचा दाखल सादर करू शकतात. तरी सर्व निवृत्ती वेतन धारकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
***********
कोरोना अलर्ट : प्राप्त 276 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 27 पॉझिटिव्ह
• 19 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 303 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 276अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 27 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 24 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 253 तर रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 276 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 1, दे. राजा शहर : 4, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : कोलवड 1, खामगांव शहर : 4, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : जळका 1, दुसरबीड 1, धार कल्याण 2, सिनगांव जहागीर 1, जळगांव जामोद तालुका : आडोळ 1, सुनगांव 1, जळगांव जामोद शहर : 1, चिखली तालुका : पाटोदा 1, शेलूद 1, भोगावती 1, चिखली शहर : 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 27 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे पाटोदा, ता. चिखली येथील 70 वर्षीय पुरूष रूग्णाचा स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 1, आयुर्वेद महाविद्यालय 1, स्त्री रूग्णालय 2, नांदुरा : 2, सिं. राजा : 2, खामगांव 2, शेगांव : 2, मलकापूर : 1, लोणार : 1, चिखली : 5.
तसेच आजपर्यंत 81584 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11379 आहे.
तसेच 1457 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 81584 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11853 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 330 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 144 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***
रब्बी हंगामासाठी पिक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 रब्बी हंगामाकरीता लागु करणेबाबत शासनाने दि. 29 जुन 2020 च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेली आहे. रब्बी हंगाम सन 2020 अंतर्गत सदर योजनेत सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2020 असून उद्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020-21 विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची जिल्ह्यासाठी निवड केली आहे. या कंपनीचा पत्ता ब्लॉक अे, हेरिटेज हाऊस, तळ मजला,6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे -411001 असा आहे. कंपनीचा ईमेल rgicl. Maharashtraagri@relianceada. com असून टोल फ्री क्र. 18001035499 आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधु, भगीनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी न.म.नाईक यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर (प्रति हेक्टरी), पिक, विमा संरक्षीत रक्कम (प्रति हेक्टरी) : गहू- विमा संरक्षीत रक्कम 38 हजार रूपये, विमा दर 570 रूपये प्रति हेक्टरी, हरभरा - विमा संरक्षीत रक्कम 35 हजार रूपये, विमा दर 525 रूपये प्रति हेक्टरी, रब्बी कांदा : विमा संरक्षीत रक्कम 80 हजार रूपये, विमा दर 4000 रूपये प्रति हेक्टरी.
राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथालयांना असमान निधी योजनेतून अर्थसहाय्य
· 8 जानेवारी 2021 पर्यंत ग्रंथालयांनी अर्ज करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2020-21 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, 50, 60,75, 100, 125 आणि 150 वे महोत्सवी वर्ष असल्यास हे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि बाल ग्रंथालय व राजा राममोहन ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य या योजनेतून देण्यात येते. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहीत मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 8 जानेवारी 2021 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असे आवाहन जिल्हा- ग्रथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथपाल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*********
No comments:
Post a Comment