BULDANA CORONA ALERT 12.4.2020

कोरोना अलर्ट : गृह विलगीकरणात 25 नागरिकांची वाढ  
 *अलगीकरणात 31 दाखल
*संस्थात्मक विलगीकरणात एकूण 80 नागरिक
बुलडाणा, दि. 12 : जिल्ह्यात गृह विलगीकरणामधील नागरिकांमध्ये 25 ने आज वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गृह विलगीकरणात 133 नागरिक आहेत. तसेच आज एक रिपोर्ट प्रयोगशाळेतून प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आहे. तसेच आज प्रयोगशाळेत तपासणीसाठी 15 नमुने पाठविण्यात आले आहे,  अशी माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.     
     काल दि. 11 एप्रिल 2020 पर्यंत 108 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातील नागरिकांची आज मुक्तता करण्यात आलेली नाही. नवीन नागरिकांची गृह विलगीकरणात आज 25 नागरिकांची वाढ झाल्यामुळे ‘होम क्वारंटाईन’च्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज 80 व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणात तीन नागरिकांची भर पडली आहे. यामधून आज 25 नागरिकांची मुक्तता करण्यात आली आहे.  संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 80 नागरिक आहेत.
     जिल्ह्यात आज शेगांव अलगीकरण कक्षात एक संशयीत दाखल करण्यात आला आहे.. सद्यस्थितीत  खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 1, बुलडाणा 18 व शेगांव येथे 12 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 31 व्यक्ती अलगीकरणात आहेत.   घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 75 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 132 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून आज एकही सुटी देण्यात आली नाही. आजपर्यंत 41 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 19 , शेगांव 11 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 248 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज 15 नमुने पाठविण्यात आले आहे. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी 191 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 17 पॉझीटीव्ह व  174 निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे.   तसेच 53 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 12 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दि. 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना  अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी पुष्प अर्पण केले.
                                                                        ………………….
    

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या