कोरोना अलर्ट : जिल्ह्यातील आज एक रिपोर्ट पॉझिटिव्ह, दोन निगेटीव्ह
* संस्थात्मक विलगीकरनात सहा नागरिकांची वाढ
* दिल्ली येथील कार्यक्रमातून परतलेल्या 12 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले
बुलडाणा, दि. 2: जिल्ह्यात आज प्रयोगशाळेतून तीन रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये एका संशयरीत व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असून दोन रिपोर्ट निगेटीव्ह पा्रप्त झाले आहे. तसेच आज बुलडाणा अलगीकरण कक्षात दाखल तीन संशयीत व्यक्तींचे नमुने व दिल्ली येथील कार्यक्रमातून परतलेल्यांपैकी जिल्ह्यातील 12 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आज भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. काल दि. 1 एप्रिल 2020 पर्यंत 90 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. मात्र गृह विलगीकरणातील 11 नागरिकांनी 14 दिवसांची निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 11 नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 79 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात आज 6 व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज मुक्तता करण्यात आलेली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 22 नागरिक आहेत.
जिल्ह्यात आज बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 3 संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 10 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 3 व बुलडाणा 7 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरिकांची निरीक्षण व तपासणी करण्यात येत आहे. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 44 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 61 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 10 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आज 18 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 11 व खामगांव येथील 7 व्यक्तींचा समावेश आहे.
आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 68 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 50 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 पॉझीटीव्ह व 45 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच 18 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
*******
कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमी : मालवाहू वाहनांना आरटीओकडून प्रमाणपत्र अनिवार्य
बुलडाणा, दि.2 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी, म्हणून प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करण्याबाबतचे प्रमाणपत्र वाहन चालकाने वाहनासोबत ठेवावे.
वाहन मालकाने सदर वाहनाचे कागदपत्रांची छायांकित प्रत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करावी. वाहनमालकांनी सदर कार्यालयाच्या mh२८@ mahatranccom.in या इमेल आयडीवर अर्ज केल्यास त्यांना ईमेलवर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. जेणेकरून संबंधित कार्यालयात गर्दी होणार नाही. त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षाच्या हेलपलाईन 07262 242244, 9172464668, 9029525473, 7722075235, 8668282047, 8421165299 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
**********
No comments:
Post a Comment