Wednesday, 15 April 2020

DIO BULDANA NEWS 15.4.2020

अन्न्‍ पदार्थांचा काळाबाजार न करता मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे
                                                                               - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, दि. 15 : अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सर्व सामान्य जनतेला त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही, तसेच ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून त्यांना खरेदी करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे अन्न पदार्थांचा काळाबाजार होणार नाही व ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. यासाठी सर्व उत्पादकांनी व वितरकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
  मुंबई येथे मंत्री महोदयांच्या दालनात वाढलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थ उत्पादक, बेबीफड उत्पादक, पॅक फुड उत्पादक व वितरक यांच्या बैठकीचे सोशल डिस्टीसिंगचे पालन करीत आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अरूण उन्हाळे, सह आयुक्त सुनील भारद्वाज, सहआयुक्त शैलेश आढाव, बृहन्मुंबईचे सहआयुक्त शशिकांत केकरे, पारले प्रॉडक्टस, मेरीको इंन्डस्ट्रीज, लिबर्टी ऑईल मिल, ग्रेन मर्चंट कन्ज्युमर प्रॉड्युसर संघटना, एवरेस्ट मसाला कंपनी व नेसले इंडिया कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
   अन्न पदार्थांचे वितरण करताना सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, सर्व नागरिकांना योग्य भावात व दर्जेदार अन्न पदार्थ उपलब्ध होतील याबाबत दक्षता घ्यावी. कंपनीचे कामगार, कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी सहआयुक्त सुनील भारद्वाज यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी. उत्पादकांच्या व वितकर यांच्या अडचणी  सोडविण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून सहआयुक्त शैलेश आढाव आणि राज्यस्तरावरील नोडल अधिकारी यांनी आयुक्तांच्या मान्यतेने राज्यभारात प्रत्येक जिल्हास्तरावर आवश्यकतेनुसार
सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त्या करावव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
   ते पुढे म्हणाले, नोडल अधिकाऱ्यांनी उत्पादक व वितरकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने निराकारण करावे. दैनंदिन कामाचा अहवाल आयुक्तांना सादर करावा. आयुक्तांनी तो मंत्री महोदयांना सादर करावा. याप्रसंगी उत्पादक व वितरक यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.    
                                                                                    **********   
कोरोना अलर्ट : आज प्राप्त पाच रिपोर्ट ‘निगेटीव्ह’
*अलगीकरणात 31 दाखल
*गृह विलगीकरणात 36 नागरिकांची वाढ
बुलडाणा, दि. 15 : जिल्ह्यात आज पाच रिपोर्ट प्राप्त झाले असून पाचही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.  त्याचप्रमाणे आज 20 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज गृह विलगीकरणात 36 नागरिकांची वाढ झाली आहे. ही संख्या आता 121 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.        
     काल दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत 93 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. त्यामध्ये आज 36 ने वाढ झालेली आहे. तसेच 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झालेल्या कुणाचीही आज 8 नागरिकांची मुक्तता करण्यात आली आहे.  संस्थात्मक विलगिकरणातून आज 22 नागरिकांची मुक्तता करण्यात आलेली आहे.  संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 29 नागरिक आहेत.
     जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात आज चार व्यक्ती दाखल करण्यात आलेल्या आहे.  सद्यस्थितीत  खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 3, बुलडाणा 26 व शेगांव येथे 2 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 31 व्यक्ती अलगीकरणात आहेत.   घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 153 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 186 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून आज  सुटी देण्यात आली नाही. आजपर्यंत 51 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 19 , शेगांव 11 व खामगांव येथील 21 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 280 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज 20 नमुने पाठविण्यात आले आहे.  एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी 250 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 21 पॉझीटीव्ह व  229 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे. तसेच 30 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
*******
जिल्ह्यात सर्व दुचाकी व तिनचाकी वाहनांना बंदी
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·        गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 15 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे.  या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व दुचाकी, तिनचाकी वाहनांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. तसेच वाहनधारक विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास संबंधितांवर 5000 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
   राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम हे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक असल्याने सदर कामावर असणारे मजूर यांची ने-आण करता येणार नाही. त्यासाठी त्यांची कामाच्या स्थळीच व्यवस्था करण्यात यावी. तसेच काम करताना सामाजिक अंतराचे पालन करावे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील. अत्यावश्वयक सेवांच्या होम डिलीवरीबाबत नागरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद व ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प यांनी व्यवस्थापन करावयाचे आहे.
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
************
कंटेन्टमेंट झोनमध्ये दवाखाने व मेडीकल वगळता अन्य दुकाने बंद
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·        झोनमधील व्यक्ती बाहेर आल्यास 5 हजार रूपये दंड
बुलडाणा, दि. 15 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याठिकाणी संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी सक्तीने करणे आवश्यक आहे.  या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनमधील कोणतीही आस्थापना, दुकाने उघडी ठेवू नये. याठिकाणी केवळ दवाखाने व मेडीकल उघडी राहतील. याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी दक्षता घ्यावी. तसेच कंटेन्टमेंट झोनमधील व्यक्ती झोनच्या बाहेर आल्यास संबंधितांवर 5000 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
  कंटेन्टमेंट झोनमधील नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी होम डीलीवरीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत इन्सीडेंट कमांडर यांनी दररोज कंटेन्टमेंट झोनला भेट देवून आवश्यक वस्तूंची होम डिलीवरीची पाहणी करावी.
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
******
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध गुन्ह्यांवर दंड लागू
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी, सार्वजनिक स्थळी थुंकण्यास बंदी
·        जिवानवश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक लावावे
बुलडाणा, दि. 15 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे.  या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात सार्वजनिक स्थळी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क न वापरणे, दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणे, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दरपत्रक न लावणे आदी गुन्ह्यांविषयी दंड लागू केला आहे.
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                            असे आहे दंड
सार्वजनिक स्थळी उदा. रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी थुंकणे हा गुन्हा करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर सार्वजनिक स्थळी मास्क अथवा रूमाल न वापरणे असे करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे. तसेच दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे हा गुन्हा पहिल्यांदा केल्यास 500 रूपये दंड प्रति ग्राहक अथवा व्यक्ती, 1500 रूपये दंड आस्थापना मालक अथवा दुकानदार, विक्रेता यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्यांदा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.किराणा अथवा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास असे पहिल्यांदा आढळल्यास 5000 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग वसूल करणार आहे.
******

No comments:

Post a Comment