कोरोना अलर्ट : आज प्राप्त रिपोर्टमध्ये 30 निगेटीव्ह, तर 2 पॉझीटीव्ह
*अलगीकरणातून 12 नागरिकांना सोडले
* संस्थात्मक विलगीकरणात एकूण 86 नागरिक
बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यातील 34 संशयीत व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेतून आज 32 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यामध्ये दोन पॉझीटीव्ह व 30 नमुने निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह मध्ये एक व्यक्ती सिंदखेड राजा व दुसरी व्यक्ती शेगांव येथील आहे, अशी माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.
काल दि. 6 एप्रिल 2020 पर्यंत 96 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातील नागरिकांची आज मुक्तता करण्यात आलेली नाही. नवीन नागरिक गृह विलगीकरणात आज दाखल नसल्यामुळे ‘होम क्वारंटाईन’च्या संख्येत वाढ झालेली नाही. तसेच जिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात आज 86 व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणात आज 08 नागरिकांची भर पडली आहे. यामधून आज मुक्तता करण्यात आली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 86 नागरिक आहेत.
जिल्ह्यात आज खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 3 व शेगांव येथे 1 संशयीताला दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे 4 संशयीतांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 14 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 5, शेगांव 1 व बुलडाणा 8 व्यक्तींचा समावेश आहे. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 57 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 95 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून 12 नागरिकांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 30 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 14 , शेगांव 5 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.
आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 126 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज 12 नमुने पाठविण्यात आले आहे. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी 112 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 11 पॉझीटीव्ह व 101 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे. तसेच 14 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
*******
गर्दी टाळण्यासाठी किराणा, पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 12 वोजपर्यंत सुरू राहणार
· कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
· जिल्हाधिकारी यांचा आदेश
बुलडाणा, दि. 7 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे, दुध, कृषी संबंधीत सर्व दुकाने, पेट्रोल पंप आजपासून सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यामधून अत्यावश्यक वस्तूंची / सेवांची वाहने तसेच औषधालय वगळण्यात आली आहेत. याबाबत संबंधीतांनी दक्षता घ्यावी, गर्दी होवू देवू नये. तसेच फळांची व भाजीपाला दुकाने 100 मीटर अंतराने लावण्यात यावी आणि ग्राहकांना प्रत्येक दुकानासमोर 1 मीटर अंतरावर ग्राहक उभे राहतील, यादृष्टीने ग्रामीण भागात गटविकास अधिकारी व नगर परिषद क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी यासाठी चुना वापरून चिन्हांकित करावे. सदर आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी.
जिल्ह्यामध्ये खामगांव, शेगांव, दे.राजा, चिखली व बुलडाणामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीती एकूण 11 रूग्ण आहेत. जवळपास जिल्ह्याच्या अर्ध्या भागामध्ये बाधीत रूग्ण आहेत. सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रोगाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्णे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार सदर निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी आदेशाचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment