Saturday, 25 April 2020

DIO BULDANA NEWS 25.4.2020



पवित्र रमजान महिन्यातही एकत्र येवून नमाज अदा करू नये
-         जिल्हाधिकारी
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. रमजान महिन्यात मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्यस्थिती विचारात घेता मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्य व जीवनाच्या हिताचे आहे. त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येवून नमाज अदा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुमन चंद्रा यांनी केले आहे.
   कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सुचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यातही कटाक्षाने करावे. कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठन, तराविह व इफ्तारसाठी एकत्र येवू नये, घराच्या अथवा इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येवू नये, मोकळ्या मैदानावर एकत्र येवून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येवू नये, कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यात मज्जाव करण्यात आलेला आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तराविह व इफ्तार आदी धार्मिक कार्य पार पाडावे.
   आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005 चे कलम 33 व साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 आणि राज्य शासनाची अधिसूचना 17 एप्रिलनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील सर्व मस्जिदमध्ये एकत्रित येवून नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. या सुचनांचे काटेकोर पालन करावे. पालन न केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 अन्वये व आपत्ती व्यवस्थपना अधिनीयमातंर्गत दंडास पात्र असणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                                    *********
अन्न पदार्थ व औषधी विक्री करताना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे
                                                                               - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सर्व सामान्य जनतेला त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही, तसेच ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून त्यांना खरेदी करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. अन्न पदार्थ व औषध विक्री करताना सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी  केले.
  नागपूर येथे लॉकडाऊनच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील अन्न पदार्थ उत्पादक, बेबीफड उत्पादक, पॅक फुड उत्पादक व वितरक, नमकीन उत्पादक यांच्या बैठकीचे सोशल डिस्टीसिंगचे पालन करीत 24 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं. भा पवार, सह आयुक्त(औषधे) पी. एन शेंडे, सहाय्यक आयुक्त अ. प्र देशपांडे, सहाय्यक आयुक्त पी.एम बल्लाळ, हल्दीराम, अजित बेकरी, दाल मिल असोसिएशन, किराणा असोसिएशन, नागपूर जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन व व्हीडीएमए चे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
   नागरिकांना दर्जेदार व योग्य भावात अन्न पदार्थ उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, रस्त्यावरील विक्री होणाऱ्या मास्कच्या बाबत योग्य ती कारवाई करण्याचत येईल. वापरलेल्या मास्कच्या विल्हेवाटीबाबत मनपा आयुक्त यांना कळविण्यात येईल.  यावेळी मंत्री महोदयांनी आयुर्वेदीक, ॲलोपॅथीक औषधांच्या निर्मिती व विक्रीबाबत विचारणा केली. यावेळी अन्न वऔषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
                                                                                    **********   
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राची इमारत तात्पुरते कारागृहासाठी अधिग्रहीत
 बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  जिल्हा कारागृह अधिक्षक यांच्या पत्रानुसार बुलडाणा कारागृहात दररोज दाखल होणाऱ्या नवीन बंद्याचा प्रवेश कोविड 19 रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आवश्यक आहे. शहरातील इतर शासकीय अथवा अशासकीय इमारतीस तात्पुरते कारागृह घोषित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमान्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलडाणा यांच्या अधिनस्त असलेले ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र , पोलीस मुख्यालयाचे मागे, सिंहगड बिल्डींग, बुलडाणा या इमारतीस तात्पुरते कारागृहासाठी पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत केली आहे.
   या इमारतीस सुरक्षेसाठी 24 तास पोलीस बंदोबस्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पुरवावा. तसेच दैनंदिन कामकाजासाठी एक तुरूंगाधिकारी व एक रक्षक/ लिपीक  यांची नियुक्ती अधिक्षक, बुलडाणा जिल्हा कारागृह यांनी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                                    ********8
  

No comments:

Post a Comment