Thursday, 15 September 2022

DIO BULDANA NEWS 15.09.2022

 

दक्षता समितीची शुक्रवारी सभा

बुलडाणा, दि. 15 : जिल्हा दक्षता समितीची सभा शुक्रवार, दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा मंगळवार, दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

ज्या नागरिकांना जिल्हा दक्षता समिती सभा तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा यामध्ये तक्रारी दाखल करावयाच्या आहेत, त्यांनी प्रतिज्ञालेखावर तक्रारी स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे तहसिलदार यांनी केले आहे.

0000

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, दि. 15 : विरोधी पक्षनेता अंबादास दानवे शुक्रवारी, दि. 16 सप्टेंबर 2022 जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

श्री. दानवे यांचे दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन अभ्यगतांशी भेटी घेतील. दुपारी 12.15 वाजता गर्जे हॉल येथील शिवसेना मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जाईचा देव ता. भोकरदन, जि. जालना कडे प्रयाण करतील.

00000

मातंग समाजासाठी बीज भांडवल योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 15 : साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील युवकांसाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येते. यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मातंग समाजातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि समाजाचे जीवनमान उंचावण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. यात मातंग समाजातील 12 पोटजातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

चालू आर्थिक वर्षात बीज भांडवल योजनेंतर्गत 50 हजार रुपये ते 7 लाख रूपयांपर्यंत जिल्ह्याला 20 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 20 टक्के आणि लाभार्थी सहभाग 5 टक्के, तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग 75 टक्के राहिल. महामंडळाच्या बीज भांडवल रक्कमेवर 4 टक्के व्याजदर आकारला जातो. अनुदान योजनेंतर्गत 50 हजार रूपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. सदर योजनेचे 75 टक्के कर्ज प्रकरणाचे उद्दिष्टे प्राप्त झाले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती पैकी असावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावी, कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रासह प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत कर्ज प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment