*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सुरुवात*
खामगाव, दि.१७ (उमाका) : खामगाव तालुक्यातील रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पंधरवाड्यास केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सुरुवात झाली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण भेट देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि वृक्षरोपण केले.
यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, सागर फुंडकर उपस्थित होते.
यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, तसेच रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. यादव यांच्या हस्ते महिला बचतगटांना धनादेश व महसूल विभाग कडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे दाखले व शिधापत्रिकाचे वितरण करण्यात आले.
रोहणा येथील कार्यक्रमात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा अंतर्गत विविध शासकीय उपक्रमांस सुरुवात करण्यात आली. यात लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण तसेच महसूल विभागाकडून देण्यात येत असलेले विविध दाखले व महिला बचत गटांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रधानमंत्री मातृवंदन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रतिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी खामगाव डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम उबरहंडे, डॉ. पानझाडे, डॉ. अजबे, डॉ. मगर, चंद्रकांत धुरंधर, सुरेश सोनपसारे, अनिल भोके, श्रीमती बगाडे, गजानन लोड, श्री. गिऱ्हे, बी.एस. वानखडे आदी उपस्थित होते.
000000
*केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयाला भेट*
*ऐतिहासिक वारसा असलेल्या शाळेला मदत करण्याचे आश्वासन-
खामगाव, दि.१७ (उमाका) : ऐतिहासिक वारसा असलेल्या येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाला केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार अॅड.आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, वैभव डवरे उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे आणि सर्व विश्वस्त यांच्यातर्फे भुपेंद्र यादव यांचा सत्कार करण्यात आला. यादव यांनी राष्ट्रीय विद्यालयाचा परिसराची पाहणी केली. महात्मा गांधी यांचे हस्ते उद्घाटन झालेले चरखालय, वल्लभभाई पटेल यांचे हस्ते उदघाटन झालेला ध्वजस्तंभ, सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिलेली जागा, वि. दा.सावरकर यांनी भेट दिलेली जागा, वास्तुकलेचा अप्रतिम नमूना असलेले कलाभवन, कलाकारखान्यामधील कलाकृती पाहिल्या. त्यावेळी गिरी यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली. यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सभास्थळी कलाचार्य पंधे गुरुजी यांचे समाधी आणि लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुताचा हार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा स्वागत सत्कार संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे यांचे हस्ते करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे यांनी निवेदन सादर केले.
यादव यांनी टिळक राष्ट्रीय विद्यालय हे गुरु शिष्य परंपरा जपणारे विद्यालय आहे. या राष्ट्रीय शाळेने शिक्षणाच्या माध्यमातून मानवी मुल्य, वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत, विद्यालयाने केलेल्या सृजनात्मक कार्य केले आहे. या केलेल्या गौरवपूर्ण कार्यामुळे विद्यालयाला भेट देण्याचा योग आला. गौरवपूर्ण इतिहास असलेल्या या शाळेला सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी संस्थासचिव तथा मुख्याध्यापक संजय पातुर्डे, उपाध्यक्ष सुरेश पारीक, कोषाध्यक्ष उमेश अग्रवाल, विश्वस्त मधुसूदन गाड़ोदिया, विश्वस्त अशोक झुंझुनुवाला आदी उपस्थित होते.
00000
*राष्ट्रीय प्रकल्प हिवरखेड तलावाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट*
*तलाव खोलीकरणामुळे सिंचनात वाढ-
खामगाव, दि. १७ (उमाका) : केंद्रीय पर्यावरण श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लघु पाटबंधारे विभागाच्या हिवरखेड येथील राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या साठवण तलावाला भेट दिली.
यावेळी आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, सागर फुंडकर, शिवा लोखंड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.
महामार्गाच्या कामात लागणाऱ्या मुरूम व इतर गौन खनिजासाठी महामार्गालगत असलेल्या नदी, नाले, तलावाचे खोलीकरण करावे. यासाठी कंत्राटदराकडून कोणती रॉयल्टी घेतली गेली नाही. त्यामुळे तळ्याचे खोलीकरण होण्यासोबतच रस्त्यासाठी गौण खनिज उपलब्ध झाले. खोलीकरणामुळे प्रकल्पांची साठवण क्षमता वाढून पिण्याचे आणि सिंचनाला पाणी उपलब्ध होईल. ही संकल्पना तत्कालीन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सांगितली होती. ती राष्ट्रीयस्तरावर बुलडाणा पॅटर्न म्हणून स्वीकारण्यात आली. या संकल्पनेंतर्गत या तलावाचे खोलीकरण झाले होते. यावर्षी झालेल्या पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे या परिसरातील पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यावर्षी रब्बीसाठी या तलावातून सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.
00000
*केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची उपजिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट*
कोविड लसीकरण केंद्र, पंतप्रधान आयुष्यमान केंद्राची पाहणी*
खामगाव. दि.१७ (उमाका ) : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांंनी आज सकाळी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र व पंतप्रधान आयुष्यमान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, आमदार डॉ. संजय कुटे, सागर फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार सुखचैन संचेती, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे, सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment