पारधी समाजातील युवकांना वाहन चालकाचे प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 9 :
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील
बुलडाणा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2021-22 या वर्षात मंजूर
निधीतून हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि.
16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारधी समाजाच्या
विकासासाठी योजना राबविण्यात येत आहे. यात पारधी समाजाच्या युवक-युवतींना हलके
वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक
लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पारधी समाजाच्या विकासासाठी असलेल्या
विविध योजनांमध्ये पारधी, फासेपारधी समाजाकडून दि. 16 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन
कामकाजाच्या दिवशी अर्ज मागविण्यात आले आहेत. पारधी समाजातील युवक, युवतींना हलके
वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि लायसन्स देणे हे प्रशिक्षण 30 दिवसांसाठी अनिवासी असणार आहे. यात
100 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभार्थ्यासाठी वयोमर्यादा
18 ते 35 वर्षे आणि किमान नववी उत्तीर्ण असावा. या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी
अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवास विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, अकोला
यांनी केले.
00000
वृद्ध कलावंत मानधन योजनेसाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा, दि. 9 : वृद्ध
कलावंतांसाठी सन 2022-23 या वर्षासाठी मानधन योजना राबविण्यात येत आहे. या
वर्षासाठी मानधन घेऊ इच्छिणाऱ्या वृद्ध कलावंतांनी आपले अर्ज संबंधित पंचायत
समितीच्या गटविकास अधिकारी यांचेमार्फत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुकांना दि. 31
ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या
नियम व अटींची पूर्तता संबंधी संपूर्ण माहिती संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर
लावण्यात आली आहे. नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी आपले
परिपूर्ण अर्ज दि. 12 सप्टेंबरपासून दि. 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत
संबंधित पंचायत समितीकडे सादर करावे लागणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी केलेले
अर्ज दप्तर जमा झाल्याने विचारात घेतले जाणार नाही. अर्जातील नमूद अटींची पूर्तता
करणाऱ्या व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या छाननीअंतीच्या पुरावा कागदपत्रासह सादर
केलेले फक्त वैध आणि योग्य अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी
यासंबंधी नियम व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावे.
मुदतीनंतर येणारे अर्ज,
अपूर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पूर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा
वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य सचिव यांनी केले आहे.
00000
महाविद्यालयातच होणार जात प्रमाणपत्र पडताळणी
बुलडाणा, दि. 9 :
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र पडताळणी आता
प्रत्येक महाविद्यालयातच होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधी ऑनलाईन अर्ज करावे
लागणार आहे. हे ऑनलाई अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी जात प्रमाणपत्र
पडताळणीचे अधिकारी महाविद्यालयात येऊन करणार आहेत.
जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीचे कर्मचारी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज
स्विकृती करणे, त्यामधील तृटी पुर्तता आणि ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी
प्रमाणपत्राचे वाटप करणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाचे प्राचार्य
आणि संबंधित कर्मचाऱ्यासाठी दि. 13 सप्टेंबर ते दि. 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत
तालुकानिहाय अर्ज स्विकृतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दि.
19 सप्टेंबर ते दि. 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे अधिकारी, कर्मचारी तालुकानिहाय महाविद्यालयात जाऊन अर्ज स्विकृतीचे कार्य
करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
जिल्ह्यातील अकरावी आणि
बारावीत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी तसेच इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेल
विद्यार्थ्यांनी आपले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या
bartivalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून त्याची प्रत घ्यावी. या प्रतीसोबत
मुळ आवश्यक कागदपत्रांसह तयार ठेवण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे सदस्य आणि उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.
00000
तोफखाना रेजिमेंटच्या माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा, दि. 9 :
जिल्ह्यातील तोफखाना रेजिमेंटच्या माजी सैनिकांसाठी दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी माजी सैनिकांनी कागदपत्रांसह उपस्थित
राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तोपची दिवस दि. 28
सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मेळावा आयोजित करण्यात येतो. या
रॅलीचा समारोप औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये माजी सैनिकांच्या
समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक, विमा कंपनी, ईसीएचएस आणि विविध अभिलेखा
कार्यालयांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. या मेळाव्यादरम्यान प्राप्त झालेल्या
माजी सैनिकांच्या समस्या आणि त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे
जिल्ह्यातील तोफखाना रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12
वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, देवीच्या मंदिरासमोर, बुलडाणा येथे उपस्थित रहावे,
असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.
0000
सामूहिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 9 :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2022-23 साठी सामूहिक शेततळे योजना
राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले
आहे.
सामुहिक शेततळे घटक
फलोत्पादन पिकासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे आणि दुष्काळी भागामध्ये
फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी 100
टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समुहाकडे
फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. यातील पात्र शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे घटकासाठी
आकारमाननिहाय अनुदान देय राहणार आहे. 34x34x4.70 मीटर आकाराच्या सामुहिक
शेततळ्यासाठी दोन हेक्टर ते पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्र
असणे आवश्यक आहे. यासाठी तीन लाख 39 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. 24x24x4
मीटर आकाराच्या सामुहिक शेततळ्यासाठी 1 हेक्टर ते 2 हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असणे
आवश्यक आहे. यासाठी एक लाख 75 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेच्या लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर सिंचन सुविधा या
घटकाखाली अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.
00000
पाणी मागणी सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 9 :
पाटबंधारे विभागाकडील प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षण मागणी करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे. संबंधितांनी दि. 21 सप्टेंबर 2022 पूर्वी पाणी आरक्षणाची मागणी
नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाकडील
प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्याबाबत सर्व नगर पालिका,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती, संबंधित ग्रामपंचायत यांनी कार्यकारी
अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.
जिल्हा पाणी आरक्षण
समितीची सभा येत्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी आरक्षणाची मागणी
नोंदविल्यास या सभेत पाणी मागणी उपस्थित करणे शक्य होईल. सदर सभेमध्ये
प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजुरी
देण्यात येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment